बिग बॉसच्या घरी पहिल्या दिवशीच प्रियांका जग्गाचे वीजे बानीसोबत वय विचारल्यामुळे भांडण झाले. यानंतर जेवणावरुन रोहन मेहराची केलेली तक्रार. करवा चौथच्या दिवशी दिन मोना आणि लोपा यांच्याशीही वाद. करवा चौथनंतर जेव्हा टास्क करण्याची वेळ आली तेव्हा जिंकण्यासाठी कपड्यांमध्येच केलेले टॉयलेट. अगदी पहिल्या दिवसापासून ते रविवारपर्यंत प्रत्येक भागात प्रियांकाचाच बोलबाला होता. तिच्या वागण्या बोलण्यातून किंवा भांडणातून ती चर्चेत होती. जेव्हा स्पर्धकांना दोन व्यक्तिंची नावं द्यायला सांगितली तेव्हा त्यांनी मनू पंजाबी आणि प्रियांका जग्गा यांचे नाव दिले. विकेण्डमध्ये कमी मतांमुळे प्रियांकाला या शोमधून बाहेर जावे लागले. पण जरी रविवारी प्रियांकाला या शोमधून बाहेर काढल्याचे दाखवले गेले असले तरी प्रियांकाचे हे एलिमिनेशन खोटे होते आणि ती अजूनही घरातच आहे. सलमानने दिलेल्या काही संकेतांमुळे प्रियंका जग्गा एलिमिनेशन होऊनही ती घरातच आहे, असे सांगितले जात आहे.

संकेत १- पहिल्याच आठवड्यात होणारे एलिमिनेशन आवडत नाही. प्रत्येकाला काही ना काही करुन दाखवण्याची संधी मिळाली पाहिजे, असे सलमान पहिल्या एलिमिनेशन होणाऱ्या स्पर्धकाचे नाव घेण्याआधी वारंवार बोलत होता. सलमानने अशा प्रकारचे बोलणे शनिवारपासून बोलायला सुरुवात केली होती आणि रविवारपर्यंत त्याच्या बोलण्यातील रोख बदलला नव्हता.

संकेत २- प्रियांकाला शेवटी जाताना सलमानने तिला सांगितले की, या संपूर्ण आठवड्यात तिच सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरली होती. असे असताना तिला या घराबाहेर जावे लागते हे थोडे आश्चर्यकारक वाटत नाही का? सलमान पुढे हेही म्हणाला की, प्रियांका बिग बॉस कार्यक्रमाच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत घरात राहील अशी त्याला आशा आहे.
संकेत ३- बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना प्रियांका ज्या दरवाजातून बाहेर जात होती तेव्हा सलमानने तिला रोखले होते. तू चुकीच्या दरवाजातून बाहेर जात आहेस, तो दरवाजा बिग बॉसच्या घरात जातो, असे सांगत सलमानने प्रियांकाला दुसऱयाच दरवाजातून जायला सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांका शोच्या बाहेर पडल्यानंतर घरामध्ये तिचे मोठ- मोठे कट आउट्स लावलेले दिसत होते.