पुलकित सम्राट आणि यामी गौतमचं ब्रेकअप?

सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांना केलं अनफॉलो

yami gautam, pulkit samrat
यामी गौतम, पुलकित सम्राट

बॉलिवूडमध्ये रिलेशनशिप, ब्रेकअप, पॅचअप या गोष्टी काही नवीन नाहीत. सेलिब्रिटींच्या नात्यांची चर्चा कलाविश्वात सतत होतच असते. यातील काही नात्यांची सुरुवात जितक्या लवकर होते, तितक्याच लवकर ती नाती तुटतातही. अभिनेता पुलकित सम्राट आणि यामी गौतम यांच्या रिलेशनशिपची सध्या जोरदार चर्चा आहे. या दोघांचंही ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांत उधाण आलं आहे.

पुलकित- यामीचं नातं संपुष्टात का आलं याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र, सोशल मीडियावर दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं आहे. पुलकितसोबतचं नातं यामीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हतं. त्यामुळेच तिने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

वाचा : बिग बींसाठी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची शूटिंग ठरतेय त्रासदायक?

दोघांनीही ‘सनम रे’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं होतं. त्यावेळीच त्यांच्यातील नातं बहरलं. पुलकितची पत्नी श्वेता रोहिरा आणि यामीमध्ये त्यावेळी वाद देखील झाला होता. काही महिन्यांपूर्वीच पुलकित आणि श्वेताचा घटस्फोट झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pulkit samrat and yami gautam breakup reports

ताज्या बातम्या