अल्लू अर्जुन ‘वेव्हज २०२५’मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत आला होता. यादरम्यान, अभिनेता मुंबई विमानतळावर दिसला. आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर ‘सेलिब्रिटी फोटोग्राफर’ पेजने एक क्लिप पोस्ट केली आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुनचा चाहता त्याच्याबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो नकार देत असल्याचे दिसत आहे.

व्हिडीओमध्ये ‘पुष्पा २’ चा अभिनेता त्याच्या कारमधून उतरताना दिसत आहे आणि त्यानंतर एक चाहता त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यास सांगतो. अभिनेता त्याची पाठ थोपटून नकार देत आहे. यानंतर, अल्लू अर्जुनचा बॉडीगार्ड त्याला बाजूला ढकलतो.

एकीकडे काही चाहत्यांना अल्लू अर्जुनाचा राग आला, तर काहींनी या प्रकरणात त्याचे समर्थनही केले. काही चाहत्यांनी म्हटले की, कधीकधी सेलिब्रिटींचे वेळापत्रक खूपच व्यग्र असते आणि ते देखील माणूसच आहेत. त्याच वेळी एकाने म्हटले की, अल्लू अर्जुन कधीही चाहत्यांबरोबर सेल्फीसाठी पोझ देत नाही.

सेल्फी काढण्यासाठी किती वेळ लागतो?

एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने कमेंट केली, “या चाहत्यांमुळेच तुमचे चित्रपट १००० कोटींपेक्षा जास्त कमाई करतात.” दुसऱ्याने लिहिले, “माझे चाहते माझी सेना आहेत… एका फोटोसाठी पाच सेकंद लागतात, फक्त चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांना लोकांच्या प्रेमाची गरज असते”.

अल्लू अर्जुनचा पुढील चित्रपट ‘AA22xA6’ हा असले. हा त्याचा २२ वा चित्रपट असेल. अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’मुळे स्वतःची एक प्रतिमा निर्माण केली आहे. आता अल्लू अर्जुनला नवीन रूपात पाहण्यासाठी त्याचे चाहतेही चांगलेच उत्सुक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पुष्पा २’ हा चित्रपट गेल्या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट प्रचंड हिट ठरला. ‘पुष्पा २’ हा चित्रपट हिंदी भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. भारतातही सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. ‘पुष्पा २’ या चित्रपटामुळे अभिनेत्याची लोकप्रियता आणखी वाढली आहे.