अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’मध्ये झळकलेला अभिनेता जगदीश प्रताप याला ३४ वर्षीय महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली ६ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. आता जवळपास दोन महिन्यांनी त्याची जामिनावर सुटका झाली आहे. तो ‘पुष्पा २’ च्या सेटवर शूटिंग करण्यासाठी परतला आहे. आत्महत्या करणारी महिला चित्रपटांमध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करत होती. तिने २३ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती.

जगदीशचा जामीन मिळाला असून तो चित्रपटाच्या शूटिंगसाठी पोहोचला आहे. टीमने आधीच सिक्वेलचे शूटिंग सुरू केले आहे. यात जगदीशची महत्त्वाची भूमिका आहे, त्यामुळे त्याची सुटका झाल्यानंतर तो आता शूटिंग सेटवर परतला आहे.

पूनम पांडेच्या निधनानंतर चर्चांना उधाण; कर्करोग नाही तर ड्रग्ज ओव्हरडोसमुळे मृत्यू?

महिला कलाकाराच्या आत्महत्येचं प्रकरण नेमकं काय?

पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती, त्यानंतर जगदीशला ताब्यात घेण्यात आलं होतं. जगदीशने पीडितेची फसवणूक केली आणि तिचा छळही केला, त्यामुळे तिने आत्महत्या केली असा आरोप तिच्या वडिलांनी केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगदीशने त्याच्या करिअरच्या सुरुवातीला काही लघुपट दिग्दर्शित केले होते. तेव्हा त्याला एक महिला भेटली होती. कालांतराने ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. नंतर मात्र दोघांचं नातं संपलं, मग जगदीशने तिला काही खासगी फोटो व व्हिडीओ पाठवले होते आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती, यामुळे तिने आत्महत्या केली होती, असं मृत महिलेच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलं होतं.