२० जानेवारी हा दिवस ‘सिनेमा लव्हर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे वळवण्यासाठी निर्माते आणि थेटर मालक विविध कल्पना राबवत असतात. आता उद्या साजरा केल्या जाणाऱ्या ‘सिनेमा लव्हर्स डे’निमित्त ‘पीव्हीआर’कडून प्रेक्षकांना एक खास ऑफर दिली जाणार आहे. ही ऑफर म्हणजे प्रेक्षकांना चित्रपट फक्त ९९ रुपयात पाहता येतील.

अनेक महिने प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली आहे. अनेक बड्या स्टार्सचे चित्रपट देखील अयशस्वी ठरले. पण गेल्या वर्षी प्रदर्शित झालेले अनेक चित्रपट उद्या ‘पीव्हीआर’मध्ये स्वस्तात पाहता येणार आहेत. पीव्हीआरच्या तिकिटांची किंमत २०० ते १००० च्यामध्ये असते. मात्र उद्या हीच सगळी तिकीटं ९९ रुपयांना विकली जाणार आहेत.

आणखी वाचा : ‘पठाण’ चित्रपट पाहा फक्त ५५ रुपयांत, जाणून घ्या कधी आणि कुठे मिळतील तिकिटं

हेही वाचा : आलिया भट्ट पुन्हा गरोदर? फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, “२.०…”

यामध्ये ‘दृश्यम २’,’ अवतार २’, ‘कुत्ते’, ‘वारिस’, ‘द काश्मीर फाईल्स’ हे चित्रपट प्रेक्षकांना ९९ रुपयात पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. ही ऑफर मर्यादित चित्रपटांसाठी आणि मर्यादित शहरांमध्ये असणार आहे. त्यामुळे उद्याचा ‘सिनेमा लव्हर्स डे’ हा चित्रपट प्रेमींसाठी खरोखरच खास ठरणार आहे.