बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा त्याचा आगामी चित्रपट ‘शेरशाह’सोबत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. आज त्याच्या ‘शेहशाह’ चित्रपटाचं पहिलं गाणं ‘रातां लम्बियां’ हे रिलीज झालंय. शूर कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आठवणी पुन्हा ताज्या करत अ‍ॅमेझॉन प्राइन व्हिडीओवरील बहूप्रतिक्षित ‘शेरशाह’च्या ट्रेलरने सर्वांच्याच अंगावर शहारे आणले होते. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची मनं गर्वाने आणि देशभक्तीने भरून आले. फॅन्सचा हाच उत्साह कायम ठेवत आज चित्रपटाचं हे पहिलं गाणं रिलीज करण्यात आलंय. या गाण्यातील सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

विष्णु वर्धन दिग्दर्शित ‘शेरशाह’ हा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी दोघेही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचं पहिलं वहिलं गाणं ‘रातां लम्बियां’ या गाण्यात या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री दिसून आली. या गाण्यात कॅप्टन विक्रम बत्रा आणि त्यांची गर्लफ्रेंड डिंपल चीमा यांच्यातील लव्हस्टोरीची एक झलक पहायला मिळाली. तनिष्क बागची यांची रचना असलेले हे गाणं गायक जुबिन नौटियाल-असीस कौर यांनी गायलेलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कधी होणार रिलीज ‘शेरशाह’

‘शेरशाह’ या चित्रपटाची निर्मीती धर्मा प्रोडक्शन आणि काश एंटरटेनमेंट यांनी केली आहे. येत्या १२ ऑगस्ट रोजी या चित्रपटाचा प्रीमियर २४० देशांमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर करण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्यासोबत शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशु अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोपडा यांच्या सुद्धा महत्त्वाच्या भूमिका आहेत.