वादविवाद, आरोप- प्रत्यारोप आणि न्यायालयीन फेरा या सर्व गोष्टींना मागे सारत सलमान खान नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा याच्या दिग्दर्शनात साकारलेल्या ‘रेस ३’ या चित्रपटातून सलमान काही साहसदृश्ये करताना दिसणार आहे. नुकताच या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला.

मुख्य म्हणजे ट्विटर ट्रेंडमध्ये भाईजानच्या चित्रपटाचा ट्रेलर ट्रेंडमध्येही आला. पण, त्यातील संवाद, साहसदृश्यं आणि एकंदरच सर्व कलाकारांचा अंदाज अनेकांनाच खटकला. वास्तवाशी कोणताही संबंध नसल्याचा इशारा चित्रपट सुरु होण्याआधी दिला जातो खरा, पण, इथे मात्र ट्रेलरमध्ये कुठेच कोणत्याच गोष्टीला तारतम्य नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. काहींनी तर RIP Logic असं म्हणत ट्रेलरविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

https://twitter.com/iSRKsSoul/status/996366820524412928

https://twitter.com/HaramiParindey/status/996372685008527363

https://twitter.com/HaramiParindey/status/996373822793121792

सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, बॉबी देओल, डेझी शाह अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कलाकारांचा अभिनयच कुठे दिसला नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. तर फक्त आणि फक्त मोठ्या बजेटमुळेच सलमानचा हा चित्रपट चर्चेत असल्याच्या प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिल्या.

https://twitter.com/OmkarSankheblog/status/996380860835233793