प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मधील स्पर्धक हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादांमुळे प्रसिद्ध असतात. आधीच वादात अडकलेल्या किंवा शोच्या सेटवर वाद निर्माण करु शकतील अशाच काही स्पर्धकांची निवड ‘बिग बॉस’मध्ये केली जाते. ‘बिग बॉस’च्या आगामी सिझनसाठी सध्या वादाच्या भोव-यात अडकलेल्या राधे माँची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
‘बिग बॉस ९’साठी काही नावे चर्चेत आहेत. त्यापैकी धक्कादायक अनुमान म्हणजे राधे माँ. शोच्या निर्मात्यांनी स्पर्धकांची निवड करण्यास सुरुवात केली असून, या संदर्भात राधे माँची भेट घेण्यात आली. जर सर्वकाही ठीक झाले तर राधे माँ ‘बिग बॉस’च्या ९व्या पर्वात दिसण्याची शक्यता आहे.
राधे माँची मिनी स्कर्टमधील छायाचित्रे समोर आल्यापासून ती वादात अडकली आहे. त्यानंतर हुंड्यासाठी छळ केल्यासारखे आरोप तिच्यावर लावण्यात आले होते. अलीकडेच टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक डॉली बिंद्राने तिच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला होता.
संग्रहित लेख, दिनांक 31st Aug 2015 रोजी प्रकाशित
‘बिग बॉस ९’ मध्ये दिसू शकते राधे माँ
प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस'मधील स्पर्धक हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादांमुळे प्रसिद्ध असतात.

First published on: 31-08-2015 at 08:44 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhe maa may be seen in bigg boss