अभिनेते शरद पोंक्षे सामाजिक, राजकीय विषयांवर आपलं मत मांडताना दिसतात. सोशल मीडियाद्वारे विविध व्हिडीओ, पोस्ट शेअर करत ते बेधडक वक्तव्य करतात. आताही त्यांनी शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. शरद यांनी एक पोस्ट शेअर करत काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांना अप्रत्यक्षरित्या सुनावलं आहे. शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता पोस्ट शेअर केली.

सुरत न्यायालयाने काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं. सध्या या सगळ्या प्रकरणावरुनच राजकारण तापलं आहे. राजकीय क्षेत्रामधील मंडळी या प्रकरणावर आपलं मत व्यक्त करताना दिसत आहेत. तर काही कलाकारांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा – Video : निक जोनसवर चाहतीनं फेकलं अंतर्वस्त्र, प्रियांका चोप्रानं असं काही केलं की…; व्हिडीओ व्हायरल

शरद यांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता म्हटलं की, “कर्माची फळं भोगावीच लागतात”. ही पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकरी विविध कमेंट करत आहेत. तरीही राहुल गांधी माफी मागणार नाहीत, काँग्रेसच्या इतर नेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे असं म्हणतात, वेळ ही प्रत्येकावर येते असं म्हणत अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा – चुलत बहिणीबरोबरच दीपिका पदुकोणच्या वडिलांनी थाटला संसार, अभिनेत्रीच्या वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद यांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता पोस्ट शेअर केली असली तरी नेटकरी मात्र भडकले आहेत. तसेच या पोस्टशी राहुल गांधी यांचा संबंध जोडण्यात आला आहे. याआधीही शरद यांनी राहुल गांधी यांच्याबाबत पोस्ट शेअर केली होती. सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावेळी शरद यांनी त्यांना सुनावलं होतं.