सध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस १४’मधील स्पर्धक राहुल वैद्यचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो अभिनेत्री अनिता हसनंदानीचा पती रोहित रेड्डीशी भांडताना दिसत आहे. त्या दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का राहुल आणि रोहितमध्ये खरेखुरे भांडण झाले नसून ते दोघे मस्ती करताना दिसत आहे.
रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राहुल वैद्यसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला राहुल आणि रोहित यांची टक्कर होते. त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाल्याचे दिसते. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. रोहित आणि राहुलने हा व्हिडीओ घरातच शूट केला आहे. ते दोघे आगमी प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करणार असल्यामुळे भेटत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी रोहितने असाच एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ शुक्ला त्याच्यासोबत दिसत होता. रोहितचा तो व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चर्चेत होता.
काही दिवसांपूर्वी रोहितच्या घरी नव्या पाहुण्याचे आगम झाले आहे. अनिताने सोशल मीडियावर बाळासोबतचे फोटो देखील शेअर केले होते. रोहित आणि अनिता मुलासोबतचे फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता रोहितने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे.
