‘गरबे की रात’ गाण्यामुळे राहुल वैद्य अडचणीत, जीवे मारण्याची धमकी

राहुलच्या ‘गरबे की रात’ या गाण्यामध्ये ‘श्री मोगल माँ’ यांचा उल्लेख आहे.

rahul-vaidya-garbe-ki-raat-nia-sharma-1200-2
(Photo: Instagram/rahulvaidyarkv)

‘बिग बॉस’ फेम राहुल वैद्यने नवरात्री उत्सवासाठी त्याचं एक खास गाणं रिलीज केलंय. राहुल सोबतच गायिका भूमि त्रिवेदीने हे गाणं गायलं आहे. तर या गाण्याच्या व्हिडीओत राहुल आणि निया शर्मा झळकले आहेत. मात्र गाणं रिलीज होताच ते वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या गाण्यामुळे राहुलला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत.

राहुलच्या ‘गरबे की रात’ या गाण्यामध्ये ‘श्री मोगल माँ’ यांचा उल्लेख आहे. गुजरातमध्ये मोगल माँ यांचे अनेक भक्त आहेत. या गाण्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. या गाण्यातून देवी चा उल्लेख काढून टाकण्यासाठी राहुलला अनेक कॉल आणि मेसेज येत असल्याचं राहुलच्या टीमकडून सांगण्यात आलंय. ई-टाइम्सशी संवाद साधताना राहुल वैद्यचे प्रवक्ता म्हणाले, “होय मेसेज आणि कॉल्सचं प्रमाण काल रात्रीपासून वाढू लागलं आहे. यात त्याला जीवी मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं बोललं जात आहे.”

तारक मेहता…’मधील टप्पूने सोनूच्या फोटोवर केली ‘ही’ कमेंट, नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

दरम्यान या गाण्यात मोगल माँ यांचा उल्लेख अत्यंत सन्मानाने करण्यात आला असून कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नसल्याचं राहुलचे प्रवक्ता म्हणाले आहेत. “जर या गाण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही त्यांच्या भावनांचा सन्मान करून हे सर्व ठीक करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला हे ठीक करण्यासाठी थोडा वेळ द्यावा अशी या सर्वांना विनंती आहे. कारण ज्या पद्धतीने आम्ही गाणं लॉन्च केलंय त्यात बदल करण्यासाठी थोडा वेळ लागेल.” असं राहुलचे प्रवक्ता म्हणाले.

‘गरबे की रात’ या गाण्यात राहुल वैद्य आणि निया शर्मा पहिल्यांदा एकत्र झळकले आहेत. हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर गाणं चांगलंच व्हायरल झालं असून अनेक नेटकऱ्यांनी रील्स बनवण्यासाठी या गाण्याची निवड केल्याचं पाहायला मिळतंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rahul vaidya receiving threats after his new song garbe ki raat kpw

ताज्या बातम्या