‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेतूल संजूने म्हणजेच संजीवनीने अखेर रणजीतचं स्वप्न पूर्ण केलंय. रणजीतला दिलेलं वटन संजुने पूर्ण केलं आहे. ढालेपाटलांच्या दारात पुन्हा एकदा लाल दिव्याची गाडी येणार असं वचन संजीवनीने रणजितला दिलं होतं हे वचन तिने पूर्ण केलंय. संजु फौजदारीण बनलीय.
या प्रवासात संजुवर अनेक अडचणी आल्या आणि काही अडचणी राजश्रीने घडवून आणल्या तरी देखील संजुची जिद्द, निर्धार तितकाच खंबीर राहिला. रणजीत आणि संजुमध्ये काही काळ दुरावा देखील आला पण तरीदेखील संजुने धीर सोडला नाही. तिच्यासमोर एक ध्येय होते रणजीत यांना दिलेले वचन पूर्ण करणे. आणि आता तो दिवस आला आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. संजु अखेर पोलिस वर्दीमध्ये रणजीत समोर येणार आहे. या दिवसापासून संजु आणि रणजीतच्या आयुष्याला एक नवे वळण मिळाणार आहे, एक नवा अध्याय सुरू होणार आहे. या प्रवासात काय काय घडेल, कशी संजुला रणजीतची साथ मिळेल ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
View this post on Instagram
मी एका दिवसात बुलेट चालवायला शिकले.
संजीवनी ढालेपाटील म्हणजेच शिवानी सोनार म्हणाली, “संजु आता एका नव्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे. या प्रवासात खूप नव्या गोष्टी मला शिकायला मिळायला आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मी एका दिवसात बुलेट चालवायला शिकले. मणीराजने खूप मदत केली बाईक शिकायला. संजुने पोलिस होणं हे माझ्यासाठी म्हणजेच शिवानीसाठी खूप जास्त जवळच आहे. मला खूप भारी संधी मिळाली आहे असं मला वाटतं. जेव्हा मी पहिल्यांदा वर्दी घालून माझ्या वडिलांना व्हिडिओ कॉल केला तेव्हा काही सेकंद ते निशब्द होते. . त्यांना झालेला आनंद बघून मला भरून आलं”. असं शिवानी म्हणाली.
राजा रानीची गं जोडी मालिकेच्या विशेष भागात म्हणजेच ८ जूनला संजु म्हणजेच रणजीतच्या फौजदारीणबाईची होणार आहे धम्माकेदार एंट्री होणार आहे.