‘राजा रानीची गं जोडी’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. अनेक दिवसांनंतर संजीनवी आणि रणजीतमध्ये जवळीक निर्माण झाली होती. त्यांचं नातं फुलू लागलं होतं. मात्र त्यांच्या आनंदावर आता विरजण पडलं आहे. दादासाहेंबांनी संजीवनी – रणजीतविरुध्द रचलेल्या नव्या कटामुळे एक नवं संकट येऊन उभं ठाकलं आहे. यामुळे दोघाच्या संसारात कुठलं मोठ वादळ येणार आहे हे प्रेक्षकांना या आठवड्यात कळणार आहे.

संजीवनी रणजीतला अटक करण्यासाठी घरी येणार आहे. तिच्यासाठी हे आयुष्यातील सगळ्यात मोठं आव्हानं असणार यात शंका नाही. पण ते म्हणतात ना, जेंव्हा नाती घट्ट होऊ पहातात तेव्हाचं त्यांची कसोटी लागते हे अगदी खरे आहे. PSI संजीवनी, ढालेपाटील यांची सून की रणजीतची बायको संजीवनी यामध्ये संजीवनीची मोठी कसोटी लागणार आहे. पण आयुष्यातील या मोठ्या संकटालादेखील राजाच्या साथीने राणी कशी मात देईल ? संजीवनी आणि रणजीत या संकटाला कसे सामोरे जातील हे येत्या भागात समोर येईल.

हे देखील वाचा: प्राजक्ता माळी उघड करणार गुपित; इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

दादासाहेब, राजश्री वाहिनी आणि अपर्णा यांनी रचलेल्या कटामध्ये रणजीत आता पुर्णपणे अडकला असून त्याच्या नावाचे अरेस्ट वॉरण्ट निघाले आहे आणि त्याला अटक करण्याची जबाबदारी संजीवनीवर सोपण्यात आलीय. आता हे बघणे उत्कंठावर्धक असणार आहे की, संजीवनी रणजीतला अटक करणार ? पुढे काय घडणार ? हे मालिकेच्या येत्या भागात कळेल.