Lal Salaam Trailer: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘लाल सलाम’ या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट बघत होते. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिने केलं आहे. यामध्ये विक्रांत व विष्णु हे दोघेही मुख्य भूमिकेत आहेत तर रजनीकांत एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. धार्मिक एकोप्याविषयी भाष्य करणारा हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे अन् एका चित्रपटाचा विषयही तितकाच संवेदनशील आहे.

ऐश्वर्याने दिग्दर्शक म्हणून या चित्रपटातून दमदार कमबॅक केलं आहे. चित्रपटात रजनीकांत मोईद्दीन भाई ही भूमिके साकारली आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘लाल सलाम’च्या टीझरने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. ट्रेलरमधून हा चित्रपट क्रिकेट हा खेळ, त्याभोवतालचं सामाजिक वातावरण, राजकारण आणि मोईद्दीन भाई यांच्याभोवती फिरताना दिसत आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

आणखी वाचा : तब्बल आठ ऑस्कर जिंकणाऱ्या ‘या’ चित्रपटातील भूमिका शाहरुख खानने नाकारलेली; नेमकं कारण जाणून घ्या

चित्रपटात बरंच नाट्य, राजकीय व सामाजिक भाष्य, आणि हलकीशी लव्ह स्टोरीदेखील पाहायला मिळणार असल्याचं ट्रेलरमधून दिसत आहे. चित्रपटात रजनीकांत यांचा हटके लुक आणि एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळत आहे. चाहत्यांना रजनीकांत यांचा हा नवा लूक चांगलाच पसंत पडला आहे. ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून चाहत्यांचा या उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याबरोबरच चित्रपटात दिग्गज माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचीही झलक पाहायला मिळत आहे.

‘जेलर’सारखा सुपरहीट चित्रपट दिल्यानंतर रजनीकांत आता ‘लाल सलाम’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे. या चित्रपटाचं संगीत ऑस्कर विजेते ए.आर रहमान यांनी दिलं असून हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी काही कारणास्तव हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही सापडला होता. आता अखेर ९ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.