प्रदर्शनापूर्वीच चित्रपट लीक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सैराट,सुलतान, ग्रेट ग्रॅण्ड मस्ती आणि असे अन्य काही चित्रपट लीक झाल्याने त्यांच्या बॉक्स ऑफीस कलेक्शनवर बराच परिणाम होताना दिसत आहे. त्यातच आता सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षित कबाली चित्रपटही आता लीक झाल्याचे कळते.
जगभरात चर्चा असलेल्या या चित्रपटाची कॉपी काही संकेतस्थळांवर डाउनलोडसाठी उपलब्ध असल्याचे कळते. पण हा चित्रपट अद्याप चित्रपट शेअरींग साइट असलेल्या टोरन्टवर आलेला नाही. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याची पायरेटेड कॉपी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मद्रास हाय कोर्टात संपर्क साधला होता. १८० पेक्षाही अधिक संकेतस्थळांवरून या चित्रपटाचे बेकायदेशीर डाउनलोड थांबवण्यासाठी निर्माते एस थानु यांनी याचिकाही दाखल केली होती.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, कबालीचे निर्माते चित्रपटाच्या बेकायदेशीर लिंक्स हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे कळते. रजनीकांत आणि राधिका आपटेची प्रमुख भूमिका असलेला कबाली येत्या २२ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jul 2016 रोजी प्रकाशित
प्रदर्शनापूर्वीच रजनीकांतचा ‘कबाली’ लीक
निर्माते चित्रपटाच्या बेकायदेशीर लिंक्स हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे कळते.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 19-07-2016 at 12:01 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajinikanths kabali leaks online three days before release