बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये राजकुमार रावचं नाव घेतलं जातं. स्वप्नांच्या नगरीत काहीतरी करून दाखवण्याच्या ध्यासाने मुंबईमध्ये आलेल्या राजकुमारने खडतर संघर्षानंतर या क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान तयार केलं आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या राजकुमारचा आज ३८ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने जाणून घेऊयात त्याची एकूण संपत्ती आणि इतर गोष्टींबाबत…

३१ ऑगस्ट रोजी गुडगाव (सध्याचं गुरुग्राम), हरियाणा येथे जन्मलेल्या राजकुमार रावचे खरे नाव राजकुमार यादव आहे. एक काळ असा होता की राजकुमारच्या कुटुंबाकडे शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते. त्यावेळी त्याच्या शिक्षकांनी दोन वर्षे त्याचा खर्च उचलला. पण आता अभिनेत्याची एकूण संपत्ती ६ दशलक्ष डॉलर आहे, म्हणजेच त्याच्याकडे ४५ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

आणखी वाचा- अखेर विकी- कतरिना ऑनस्क्रीन दिसणार एकत्र, लग्नानंतर ‘या’ प्रोजेक्टवर करतायत काम

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजकुमार रावला त्याच्या पदार्पणाचा चित्रपट ‘लव्ह सेक्स और धोका’साठी फक्त १६ हजार रुपये मिळाले होते, तर आता तो एका चित्रपटासाठी ४-५ कोटी रुपये एवढं मानधन घेतो. याशिवाय तो अनेक ब्रँडचा अॅम्बेसेडर देखील आहे. राजकुमार राव प्रत्येक ब्रँड एंडोर्समेंटसाठी १ कोटी रुपये घेतो. तो चित्रपटांव्यतिरिक्त ब्रँड्समधूनही कोट्यवधींची कमाई करतो. अभिनेत्याला घड्याळांची आवड आहे आणि त्याच्याकडे लाखो रुपयांची अनेक घड्याळे आहेत.

आणखी वाचा- “मी मध्यमवर्गीय कुटुंबात…” क्रिती सेनॉनने स्पष्ट केलं ‘लस्ट स्टोरीज’ नाकारण्याचं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकुमार रावकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. त्याच्याकडे ७० लाख रुपयांची ऑडी Q7 आहे. याशिवाय मर्सिडीज CLA 200 कार आहे, ज्याची किंमत ३० ते ६० लाख रुपये आहे. इतकंच नाही तर राजकुमारला बाइक्सचंही वेड आहे. त्यांच्याकडे हार्ले डेव्हिडसन फॅट बॉय बाईक आहे, ज्याची किंमत १९ लाख रुपयांच्या आसपास आहे.