scorecardresearch

Video : लग्नानंतर राखी सावंतने आदिलवर केले गंभीर आरोप, आता नवऱ्याबरोबरच रोमान्स करतानाचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल

राखी सावंतचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल, व्हिडीओ पाहून नेटकरीही भडकले

Video : लग्नानंतर राखी सावंतने आदिलवर केले गंभीर आरोप, आता नवऱ्याबरोबरच रोमान्स करतानाचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल
राखी सावंतचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल, व्हिडीओ पाहून नेटकरीही भडकले

ड्रामा क्वीन राखी सावंतने काही महिन्यांपूर्वीच बॉयफ्रेंड आदिल खानबरोबर गुपचूप लग्न केलं. तिने अलिकडेच सोशल मीडियाद्वारे लग्नाचे फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. त्यानंतर राखीने आदिलवरच आरोप करण्यास सुरुवात केली. दरम्यान राखीचा कॅमेऱ्यासमोरच रडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

आणखी वाचा – ‘वेड’ची कमाई पाहून भारावली रितेश देशमुखची वहिनी, म्हणाली, “४१ कोटी रुपयांचा…”

राखी सावंतचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल

७ महिन्यांपूर्वीच म्हणजेच जुलै २०२२ मध्ये राखी-आदिलने कोर्ट मॅरेज आणि निकाह केला होता. तर दुसरीकडे आदिल मात्र या सत्यापासून दूर जाण्याच्या प्रयत्नात होता. राखीने आदिलसह त्याच्या कुटुंबियांवर आरोप केले. आता तिने आदिलबरोबरचा बेडरुम व्हिडीओ शेअर करताच नेटकरीही भडकले आहेत.

राखीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आदिलने तिला मिठी मारलेली दिसत आहे. तर राखी तिचा बेडरुमही दाखवत आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं की, “माझी नवरा, माझं प्रेम आदिल”. राखीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दोघांमध्ये नक्की चाललंय काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

आणखी वाचा – Photos : आधी लग्न केलं, आता नवऱ्याचं दुसऱ्याच अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचा राखी सावंतचा दावा, म्हणाली, “त्याने माझा..”

नेटकऱ्यांनी राखीचा हा व्हिडीओ पाहून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कधी रडते, कधी हसते माहित नाही यांच्यामध्ये नक्की काय आहे, तुझं चाललंय काय राखी, राखी सावंत लग्नाचं नाटक करत आहे अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. पण खरंच हे लग्न म्हणजे राखीचा पब्लिसिटी स्टंट आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 11:20 IST

संबंधित बातम्या