अभिनेत्री राखी सावंत सध्या आदिल खान दुर्रानीबरोबरच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. आदिल हा बिझनेसमन आहे. हल्ली तर दोघेही एकमेकांबरोबरच दिसतात. आदिलही मीडियाशी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल बोलत असतो. राखी आणि आदिलचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि वेळोवेळी ते त्यांचं प्रेम व्यक्त करत असतात.  

राखी सावंत बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी बदलणार धर्म? आदिल स्पष्टच म्हणाला, “माझा मुस्लिम धर्म…”

राखी आदिलबरोबर रिलेशनशिपमध्ये आल्यापासून तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल तर तुमच्या लक्षात येईल की ती आता पूर्वीसारखे बोल्ड आउटफिट्स कॅरी करत नाही. ती नॉर्मल ड्रेसमध्ये दिसते. राखी आदिलवरील प्रेमामुळे बोल्ड कपडे घालत नसल्याचं म्हटलं जातंय. राखी सावंतचं आदिलवर इतकं प्रेम आहे की त्याच्यासाठी ती बुरखा घालण्यास तयार आहे. इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, राखीने स्वतः खुलासा केलाय की आदिल आणि त्याच्या कुटुंबाला राखीने ग्लॅमरस आणि शॉर्ट ड्रेस घातलेले आवडत नाही. त्यामुळे तिने नॉर्मल आणि सिंपल ड्रेस घालायला सुरुवात केली आहे.

फक्त ५० रुपयांसाठी अनिल अंबानींच्या लग्नात जेवण वाढायला गेली होती ‘ही’ अभिनेत्री; आता आहे कोट्यवधींची मालकीण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिपोर्टनुसार, राखी सावंतच्या मते, तिला आदिल आणि त्याच्या कुटुंबाला दुखवायचे नाही. त्यामुळेच ती नॉर्मल आणि सिंपल आउटफिट्स परिधान करतेय, यामुळे ती स्वतः खूप आनंदी असल्याचंही म्हणाली. तर, आदिलला याबाबत विचारलं असता तो म्हणाला, राखी शॉर्ट आणि विचित्र कपडे घालायची. म्हणूनच आपण तिला नॉर्मल आणि सिंपल कपडे घालण्यास सांगितलं आहे.