मागच्या काही दिवसांपासून बिग बॉस १५ शो सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. लवकरच या शोचा अंतिम सोहळा पार पडले. पण त्यापूर्वी बिग बॉसच्या घरात तिकिट टू फिनाले आठवडा सुरू आहे. दरम्यानच्या काळात राखी सावंत आणि शमिता शेट्टी यांच्यात भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर राखीनं शमिताची खिल्ली उडवल्यानं शामिता दुःखी झाल्याचं नुकत्याच प्रसारित झालेल्या एका प्रोमो व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.

‘विकेंड का वार’मध्ये राखी सावंत शमिता शेट्टीची खिल्ली उडवत असलेली पाहायला मिळाली. नुकत्याच झालेल्या ‘विकेंड का वार’मध्ये जेव्हा सलमान खान शमिताला, ‘तुझा हात आता कसा आहे?’ असं विचारतो. त्यावर शमिता काही बोलणार त्याआधीच राखी तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात करते. राखीचं वागणं पाहून शमिता तिथून बाहेर निघून जाते. यानंतर शमिताचा मानलेला भाऊ राजीव आणि बहीण शिल्पा शेट्टी यांनी शमिताला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं.

इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना राजीवनं लिहिलं, शमिता खूप दुःखी आहे. मी तिच्या हात-पायांना मसाज करत असे जेणेकरून तिला आराम मिळेल आणि ती शांतपणे झोपू शकेल. शमिताच्या खांद्याला दुखापत झाली होती. ज्यावर उपाचार सुरु आहेत. पण तिने अद्याप हार मानलेली नाही. ती एक खंबीर मुलगी आहे. तिला एका टास्कच्या वेळी दुखापत झाली होती त्यावेळी डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरीही तिने कोणतीही तक्रार न करता घरातील कामं करत होती.

राजीवची ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत शिल्पानंही बहीण शमिताला पाठींबा दिला आहे. शिल्पा आणि राजीवची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘विकेंड का वार’मध्ये शमितासोबत जे झालं त्यानंतर अशी पोस्ट शेअर करत राजीव आणि शिल्पानं शमिताला पाठींबा देत ती खूप खंबीर असल्याचं म्हटलं आहे. राजीवची पोस्ट शेअर करत शिल्पानं त्याचे आभार मानले आहेत.