ड्रामा क्वीन अशी ओळख असलेली राखी सावंत ही सातत्याने चर्चेत आहे. राखी सावंत ही दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाली. तिने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीबरोबर निकाह केल्याचे बोललं जात आहे. राखी सावंत आणि आदिल दुर्रानीचा सात महिन्यांपूर्वी निकाह झाला आहे. त्या दोघांचा निकाह २९ मे २०२२ ला झाला असून त्यांनी २ जुलै २०२२ ला लग्नाचे रजिस्ट्रेशन केले आहे. नुकतंच तिने तिच्या लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत. यावर आदिलने मौन बाळगले आहे. तर आता दुसरीकडे राखी सावंत प्रेग्नेंट असल्याचे बोललं जात आहे.

राखी सावंत आणि आदिल यांनी सात महिन्यांपूर्वी निकाह केला आहे. त्यानंतर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने फॅमिली प्लॅनिंगबद्दल भाष्य केले आहे. यामुळे राखी सावंत लवकरच आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या खासगी आयुष्यबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
आणखी वाचा : “मी बिग बॉसमध्ये असताना तो दुसऱ्या…” राखी सावंतचे आदिलवर गंभीर आरोप

“मी आदिलबरोबर लग्न केल्याचा मला खूप आनंद आहे. मात्र तो ही गोष्ट का नाकारतोय याचे कारण मला अजूनही समजत नाही. आदिल लग्नाला नकार देतोय हे ऐकून मला धक्का बसला आहे. गेल्या सात महिन्यांपासून मी त्याला सांगतेय की, आपण आपल्या लग्नाबद्दल सर्वांना सांगायला हवे. कारण मी एक सेलिब्रिटी आहे. माझे जीवन कोणापासून लपून राहू शकत नाही. लग्नानंतर प्रेग्नेंसी किंवा काहीही होऊ शकते”, असे राखी म्हणाली.

यावेळी राखी सावंतला प्रेग्नेंसीबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, “मला सध्या याबद्दल काहीही बोलायचे नाही. सध्या मी लग्नाबाबत जो खुलासा केला आहे तोच खूप महत्वाचा आहे. जर ही गोष्ट सर्वांसमोर आली नसती तर खूप त्रास झाला असता. मला खूप भीती वाटते आहे. माझ्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे. जर मी सिंगल मदर झाले तरी मी मरेपर्यंत आदिलवर प्रेम करेन.”

आणखी वाचा : गळ्यात वरमाला, हातात मॅरेज सर्टिफिकेट; नवविवाहित राखी सावंतच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो पाहिलेत का? 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान राखीच्या लव्ह लाइफची नेहमीच चर्चा होताना दिसते. राखीनं २०१९ मध्ये एनआरआय असणाऱ्या रितेशबरोबर लग्न केलं होतं. ते दोघे बिग बॉसच्या रिअ‍ॅलिटी शो मध्येही दिसले होते. पण २०२२ मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याचवर्षी राखी आणि आदिलने डेट करण्यास सुरुवात केली.