छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री केलेले राखी आणि तिचा पती रितेश सतत चर्चेत आहे. रितेश खूप चांगला आहे असे राखी नेहमी बोलताना दिसते. त्यात आता रितेशच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

रितेशच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रितेश तिला पट्ट्याने मारायचा असे तिने सांगितले आहे. एवढचं काय तर सोशल मीडियावर रितेशच्या पत्नीचे आणि मुलांचे फोटो व्हायरल झाले आहेत. ते फोटो पाहिल्यानंतर रितेशने त्याचं बिंग फुटल्याचं म्हटलं आहे. रितेशने या सगळ्या आरोपांवर स्पष्टीकरण देत सांगितले की ‘मी हे पैशांसाठी केलं आहे. मला माझ्या करिअरची आणि भविष्याची चिंता होती. त्यामुळे माझ्या विषयी द्वेष पसरवू नका. मी अत्यंत साधारण व्यक्ती आहे. फक्त पैशांसाठी मी हे काम केलं आहे’, असे रितेश म्हणाला.

आणखी वाचा : आराध्या बच्चनची ‘ती’ भविष्यवाणी ऐकून बच्चन कुटुंबियांना बसला होता धक्का

आणखी वाचा : ‘हा चित्रपट नसून सॉफ्ट पॉर्न फिल्म…’, आयुषमानच्या चित्रपटावर अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रितेशच्या पहिल्या पत्नीचे नाव स्निग्धा प्रिया असे आहे. तिनं एका मुलाखतीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. रितेशनं जी माहिती दिली आहे ती खोटी आहे. तो कोणत्याही कंपनीचा मालक नाही. तो मूर्ख माणूस आहे. मला त्यानं पट्टयानं मारहाण केली आहे. आमच्या लग्नाला सात वर्षे झाली आहेत. १ डिसेंबर २०१४ रोजी बिहारमध्ये आमचे लग्न झाले. तिच्याकडे सगळे पुरावे असल्याचे स्निग्धानं सांगितलं आहे.