आलिया भट्ट आणि रणबीर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. लग्नाची सर्व तयारी झाली असून आरके स्टुडिओ आणि कृष्णा राज बंगला देखील सजवण्यात आला आहे. याच ठिकाणी आलिया आणि रणबीर सप्तपदी घेणार असल्याचं बोललं जात आहे. या दोघांच्या लग्नावर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी देखील आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अलिकडेच अभिनेता संजय दत्तनं देखील या दोघांच्या लग्नावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर त्यानं अभिनेता रणबीर कपूरला लग्नाआधी खास सल्ला देखील दिला आहे.

संजय दत्त आणि रणबीर कपूर यांचं खास बॉन्डिंग आहे. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. जेव्हा अलिकडेच संजय दत्तला आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यानं यावर मजेदार प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘जर ते दोघं लग्न करत आहेत. तर मी खूप खुश आहे. आलिया तर माझ्या समोरच मोठी झाली आहे. आलिया आणि रणबीर दोघंही माझ्यासाठी खूप खास आहेत.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय दत्तनं रणबीरला दिला सल्ला
संजय दत्त म्हणाला, ‘लग्न हे एक असं वचन आहे. जे पती पत्नी एकमेकांना देतात. प्रत्येक वेळी एकमेकांना साथ द्या आणि एकमेकांचा हात पकडून आनंदात राहा.’ यासोबतच रणबीरला उद्देशून संजय म्हणाला, ‘रणबीर लवकरच फॅमिली प्लान कर आणि आनंदात राहा.’ रणबीर कपूरनं संजय दत्तच्या ‘संजू’ या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. जो बॉक्सऑफिसवर तुफान चालला होता. फक्त देशातच नाही तर परदेशातही या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती.