रणबीर आणि कतरिनाच्या आगामी “जग्गा जासूस” या बहुचर्चित सिनेमाचं पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. यंगस्टरच्या पसंतीस उतरलेलं “उल्लू का पठ्ठा” हे गाणं युट्युबवर सध्या धमाल गाजतंय. “उल्लू का पठ्ठा” या पहिल्या गाण्यापासून सिनेमाच्या प्रमोशनची सुरूवात झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. या गाण्यातल्या स्टेप्स अनेकांचे लक्ष वेधत आहेत. अशा अनोख्या स्टेप्स यापूर्वी कोणत्या गाण्यात पाहायला मिळाल्या नव्हत्या अशा प्रतिक्रियाही प्रेक्षकांकडून येत आहेत.
अलका कुबल- आठल्येंच्या मुलीची गगन भरारी
रणबीर आणि कतरिनाला या अनोख्या स्टेप्स देणारा हा अवलिया आहे प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावर. शामकने या गाण्यासाठी खास वेगळ्या धाटणीची कोरिओग्राफी केली आहे. जग्गा (रणबीर) व श्रुती (कतरिना) हे वेगवेगळ्या शहरांतून फिरत नृत्यामार्फत लोकांचे मनोरंजन करून पैसे जमा करत असतात. त्यामुळे शामकने त्याची कोरिओग्राफीही थोडी हटकेच ठेवली आहे. बऱ्याच काळानंतर शामक पुन्हा आल्या डान्स स्टाइलची भुरळ प्रेक्षकांवर पाडणार आहे असं “उल्लू का पठ्ठा” या गाण्यातून दिसतंय. या दोघांची केमिस्ट्री गाण्यात उत्तम दिसत आहे. अनुराग बासू दिग्दर्शित या सिनेमात रणबीर-कतरिनाची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकही नक्कीच उत्सुक आहेत.
अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी गायलेल्या या गाण्याची चालही अगदी सुरेख आहे. ‘उल्लू का पठ्ठा’ या गाण्यातही जिराफ, झेब्रा, ऑस्ट्रीच, शेळ्या हे प्राणी पाहायला मिळत आहेत. १४ जुलै रोजी रणबीर- कतरिनाच्या रुपात बॉलिवूडचे हे क्यूट हेर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
VIDEO: राणा डग्गुबतीच्या आगामी चित्रपटाचा दमदार टिझर पाहिलात का?
दरम्यान, हे गाणे चित्रीकरण करताना अनेक हास्यास्पद प्रसंगही घडले. ‘उल्लू का पठ्ठा’ या गाण्याचा एक भाग म्हणून रणबीरला रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या स्थानिकांकडे पैसे मागावे लागणार होते. त्यामुळे सरावासाठी का असेना पण, रणबीरने चक्क मोरक्कोमध्ये भीक मागितली होती. त्यामुळे फक्त कॅमेऱ्यासमोरच नाही तर, कॅमेऱ्याच्या मागेही भारतातील हा स्टार अभिनेता मोरक्कोत भिकारी झाला अशी प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. किंबहुना रणबीरच्या आयुष्यातही हा असा अनुभव पहिल्यांदाच आला असेल.