बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी त्याच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या खासगी आयुष्यामुळे. रणबीर गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री आलिया भट्टला डेट करत आहे. ते दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आलियापूर्वी रणबीरने दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफला डेट केले होते. रणबीरने एका मुलाखतीमध्ये एक्स गर्लफ्रेंड विषयी धक्कादायक खुलासा केला होता.
२०१७मध्ये रणबीरने फिल्मफेअरला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने अवॉर्ड मिळाल्यानंतर कसे वाटते याचा खुलासा केला होता. ‘रॉकस्टार’ या चित्रपटासाठी क्रिटिक्स चॉइस आणि पॉप्युलर अवॉर्ड मिळाल्यानंतर कसे वाटत होते याबाबत रणबीरने सांगितले होते. त्यावेळी त्याने त्याची एक्स गर्लफ्रेंड भांडणे झाल्यावर अवॉर्ड तोडून टाकायची असे म्हटले होते.
आणखी वाचा : ‘मी जावेद अख्तर यांची…’, हातात भगवद् गीता आणि टीशर्टवरील संदेशमुळे उर्फी जावेद चर्चेत
‘माझी एक गर्लफ्रेंड होती जी नेहमी आमची भांडणे झाली की माझे अवॉर्ड तोडून टाकायची’ असे रणबीर म्हणाला. पुढे तो हसत म्हणाला, ‘मी तिच्याजवळ जायचो आणि बोलायचो अगं त्या फिल्मफेअरला हात लावू नकोस.’
रणबीर कपूर आणि आलिया लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागर्जुन आणि डिंपल कपाडिया हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२२मध्ये प्रदर्शित होणार आहे. या शिवाय रणबीर ‘शमशेरा’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.