सध्या देशभरामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची चर्चा असतानाच आता आणखीन एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आलीय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट म्हणजेच बायोपिक बनवण्याची घोषणा करण्यात आली असून सरबजीत या चित्रपटासाठी प्रंचड मेहनत घेणारा अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची भूमिका साकारणार आहे. सावरकरांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहे.

…म्हणून रणदीपची निवड
सावरकरांची भूमिका साकारण्याचं मोठं आव्हान आता रणदीपसमोर आहे. मात्र ज्या कामामध्ये जीव ओतावा लागतो असं कामच स्वीकारावं अशी भूमिका या चित्रपटासंदर्भात बोलताना रणदीपने मांडलीय. रणदीपचं सध्या नेटफ्लिक्सवरील ‘एक्स्ट्रॉर्शन’ या चित्रपटासाठी कौतुक होताना दिसतंय. विशेष म्हणजे आता रणदीप सावकरांची भूमिका साकारणार असून या चित्रपटाची निर्मितीही ‘सरबजीत’ चित्रपटाचे निर्मातेच करणार आहे. या चित्रपटामधील सावरकरांच्या भूमिकेसाठी शरीरयष्टी आणि सर्वच बाबतीत रणदीप अगदी उत्तम आहे, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे.

Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

कथा सांगण्याची योग्य वेळ
“सध्या त्या कथा सांगण्याची उत्तम वेळ आहे ज्यांच्याकडे यापूर्वी आपण कानाडोळा केला होता. वीर सावरकरांच्या आयुष्यावरील चित्रपटाची कथा ही एक उत्साहाने भरलेली कथा असेल. आपण आपला इतिहास पुन्हा पहावा यासाठी ही कथा प्रेरणादायी ठरेल,” असं महेश मांजरेकर यांनी म्हटलंय. “आम्ही या चित्रपटावर काम सुरु केलंय हे सांगताना मला फार आनंद होतोय. चित्रपटाच्या पटकथेचं काम जवळवजळ पूर्ण होत आलंय. लवकरच या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे,” असं महेश मांजरेकर यांनी स्पष्ट केलंय.

रणदीपला आनंद गगनात मावेनासा…
भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील एका महत्वाच्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची संधी मिळत असल्याने रणदीप फारच आनंदात आहे. “असे अनेक नायक आहेत ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठी भूमिका पार पाडली होती. मात्र त्यांच्या कामाचं तितकं कौतुक झालं नाही. त्यांच्या कथा खरोखरच सांगितल्या गेल्या पाहिजे,” असं मत रणदीपने व्यक्त केलंय. निर्मात्यांबद्दल बोलताना रणदीपने हा चित्रपट यशस्वी ठरेल असं म्हटलंय. “निर्माते संदीत सिंह यांनी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटासाठी माझी निवड केलीय. ‘सरबजीत’नंतर मी पुन्हा संदीप यांच्यासोबत काम करत असून आमची जोडी कायमच यशस्वी राहिलीय,” असं रणदीप म्हणालाय.

कधी सुरु होणार चित्रिकरण?
याच वर्षी जून महिन्यामध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचं चित्रिकरण याच वर्षी जून महिन्यामध्ये सुरु होणार आहे. या चित्रपटाचं चित्रिकरण लंडन, महाराष्ट्र आणि आंदमान निकोबार बेटांवर होणार आहे. चित्रपटामध्ये वेगवेगळ्या कालावधीत भारताच्या स्वातंत्र्यासाठी कसा लढा देण्यात आला यावर भाष्य करण्यात येणार आहे.

आपल्या पुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख का नाही?
निर्माते संदीप सिंह यांनी, “भारतामध्ये असे फार कमी अभिनेते आहेत जे आपल्या अभिनयाची छाप सोडतात. रणदीप त्याच अभिनेत्यांपैकी एक आहे. वीर सावरकर यांना भारतीय इतिहासामधील सर्वाधिक चर्चेत आणि वादात राहिलेल्या क्रांतीकारकांपैकी एक मानलं जातं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवायचा ठरवलं तेव्हा डोळ्यासमोर रणदीपच उभा राहिला. वीर सावरकर यांच्या योगदानाकडे कानाडोळा करता येणार नाही. मला आश्चर्य वाटतं की आपल्या इतिहासांच्या पुस्त्कांमध्ये वीर सावरकरांच्या कामाचा साधा उल्लेखही का करण्यात आलेला नाही?,” असं संदीप यांनी म्हटलंय.