भोजपुरी अभिनेत्री रानी चॅटर्जीने सोशल मीडियाद्वारे काही धक्कादायक खुलासे केले आहेत. रानीने एका इन्स्टा पोस्टद्वारे आपल्या नैराश्याबाबत सांगितलं. या पोस्टमध्ये तिने मुंबई पोलिसांना देखील टॅग केलं होतं. जर तिने त्या व्यक्तीमुळे आत्महत्या केली तर याचे जबाबदार पोलीस असतील असा गौप्यस्फोट तिने केला होता. तिच्या या पोस्टची दखल घेत मुंबई पोलिसांनी त्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
अवश्य पाहा – “कमाल आर. खानला अनफॉलो करा”; दिग्दर्शकाची अमिताभ बच्चन यांना विनंती
View this post on Instagram
नेमकं हे प्रकरण काय आहे?
गेल्या काही दिवसांपासून एक व्यक्ती रानी विरोधात फेसबुकवर काही आक्षेपार्ह कॉमेंट लिहित आहे. या कॉमेंट्समुळे रानी नैराश्यामध्ये गेली होती. तिने आत्महत्या करण्याचा विचार देखील केला होता. परंतु आता पोलिसांनी या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. रानीने एका इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. तसेच या कारवाईसाठी तिने मुंबई पोलिसांचे आभार मानले.
रानी चॅटर्जी एक प्रसिद्ध भोजपूरी अभिनेत्री आहे. तिने ‘घरवाली बाहरवाली’, ‘देवर बडा सतावेल’, ‘दुलारा’, ‘रानी नंबर ७८६’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. रानी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. या पार्श्वभूमीवर तिची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.