scorecardresearch

“तुला दीपिकाने बनवलेले जेवण आवडते का?”, रणवीर सिंह म्हणाला “मी तिच्या…”

यावेळी एका चाहत्याने रणवीरला दीपिकाबद्दल एक प्रश्न विचारला.

बॉलिवूडमधील कायम चर्चेत असलेलं कपल म्हणजे रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण. रणवीर आणि दीपिकाच्या ऑन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीचे अनेक चाहते आहेत. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. दीपिका आणि रणवीर दोघेही एकमेकांविषयी नेहमी विविध गोष्टींचा खुलासा करताना दिसतात. नुकतंच रणवीरने ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याला दीपिकाबद्दल एक प्रश्न विचारला. ज्याचे रणवीरने फार मजेशीररित्या उत्तर दिले.

रणवीर सिंह हा सोशल मीडियावर फारच सक्रीय असतो. तो सोशल मीडियावर त्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच रणवीरने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्याने रणवीरला दीपिकाबद्दल एक प्रश्न विचारला. त्या चाहत्याने रणवीरला विचारले की, तुला दीपिकाने बनवलेले जेवण आवडते का? यावर रणवीरनेही फार मजेशीररित्या उत्तर दिले.

त्यावर रणवीर म्हणाला, “मी तिच्या जेवणाचा खूप मोठा चाहता आहे. मला ती जे काही बनवते ते प्रचंड आवडते. ती एक अप्रतिम कुक आहे. तसेच ती बहुगुणसंपन्नही आहे.” रणवीरने सिंहने हे उत्तर देताना दीपिकाला टॅग केले आहे. दीपिकानेही रणवीरच्या या उत्तराला प्रत्युत्तर दिले आहे. “तू ब्राऊन पॉईंट्स मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे का?” असे दीपिका मजेशीर पद्धतीने म्हणाली.

“…अन् मी पुढचे ६ महिने आरशात पाहण्याची हिंमत केली नाही”, विद्या बालनने केला धक्कादायक खुलासा

दरम्यान दीपिका आणि रणवीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वीच दीपिकाचा ‘गहराइयां’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानतंर ती ‘फायटर’ आणि ‘पठाण’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर दुसरीकडे रणवीर सिंह हा ‘जयेशभाई जोरदार’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘सर्कस’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranveer singh answers fan question about deepika padukone cooking know what she said nrp

ताज्या बातम्या