अभिनेत्री विद्या बालन हिने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य मिळवलं आहे. उत्तम अभिनय आणि संवादकौशल्य यांच्या जोरावर विद्याने कलाविश्वात स्वत:च अढळ स्थान निर्माण केलं आहे.मालिकांपासून करिअरची सुरुवात करणारी विद्या आज कलाविश्वातील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विद्या बालन ही लवकरच ‘जलसा’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विद्या बालनने तिच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे.

विद्या बालनची गणना बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्रींमध्ये केली जाते. नुकतंच ‘जलसा’ चित्रपटाच्या निमित्ताने तिने एका वृत्तपत्राशी बातचीत केली. यावेळी ती म्हणाली, “मला आतापर्यंत अनेक चित्रपटात रिप्लेस करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत मला अनेक निर्मात्यांचे फोन आले. या सर्वांनी मला त्यांच्या चित्रपटात रिप्लेस केले होते. पण मी देखील त्यांनाही मोठ्या प्रेमाने नकार दिला.”

“मला तब्बल १३ चित्रपटांमधून बाहेर काढण्यात आले. एकदा असंच एका निर्मात्याने मला चित्रपटातून हाकलून दिले होते. त्याने मला अतिशय वाईट वागणूक दिली. तो माझ्याशी इतके वाईट वागला की पुढचे सहा महिने आरशात स्वतःकडे पाहण्याची हिंमतच करु शकले नाही”, असा खुलासा विद्या बालनने केला.

“मी २००३-२००४ या दरम्यान के. भालचंद्र यांचे दोन चित्रपट साइन केले. त्यावेळी मला अनेक चित्रपटात रिप्लेस करण्यात आले होते. यानंतर काही दिवसांनी मला के. बालचंद्र यांच्याही दोन चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. विशेष म्हणजे याबाबत मला काहीही कल्पना देण्यात आली नव्हती. जेव्हा या चित्रपटाच्या शूटिंगसाठी न्यूझीलंडला जायचे होते तेव्हा मला याबाबत संशय आला. त्यांनी माझा पासपोर्टही मागितला नाही. माझ्या आईने भालचंद्र यांच्या मुलीला फोन केला, तेव्हा कळले की मला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे”, असेही तिने सांगितले.

“त्यावेळी मला इतका राग आला होता की मी भर उन्हाळ्याच्या दिवसात मरीन ड्राइव्हवरून वांद्र्यापर्यंत पायी चालत गेली होती. मी त्यावेळी खूप रडली. या सर्व आठवणी खूप त्रासदायक आहेत.” असे विद्या बालनने म्हटले.

‘डान्स इंडिया डान्स’ फेम धर्मेशचे अकाऊंट हॅक, फोटो शेअर करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्या बालनने ‘हम पांच’ या कॉमेडी शोमधून पदार्पण केले. विद्या बालन हिने परिणीता, भूल भुलैया, हल्ला बोल यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. विद्या बालन ही लवकरच जलसा चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपटात येत्या १८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विद्यासोबत मानव कौल, शेफाली शाह, रोहिणी आणि इक्बाल खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.