scorecardresearch

दीपिकासोबतच्या ‘त्या’ किसिंग सीनबद्दल रणवीर सिंहचा खुलासा, म्हणाला “आम्ही इतके गुंतले होतो की…”

या चित्रपटातील एका सीनमध्ये ते दोघेही इतके मग्न झाले होते की दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही दोघे थांबले नव्हते.

बॉलिवूडमधील कायम चर्चेत असलेलं कपल म्हणजे रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण. रणवीर आणि दीपिकाच्या ऑन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीचे अनेक चाहते आहेत. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. दीपिका आणि रणवीर दोघेही एकमेकांविषयी नेहमी विविध गोष्टींचा खुलासा करताना दिसतात. रणवीर सिंह हा सध्या त्याच्या आगामी जयेशभाई जोरदार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच रणवीर सिंहने ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटादरम्यान किसिंग सीनबद्दल खुलासा केला आहे.

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या भन्सालींच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात पहिल्यांदा दीपिका आणि रणवीर यांनी स्क्रीन शेअर केली होती. याच चित्रपटादरम्यान त्या दोघांमध्ये जवळीक वाढायला सुरुवात झाली. या चित्रपटात अनेक रोमँटिक सीन पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या चित्रपटातील एका सीनमध्ये ते दोघेही इतके मग्न झाले होते की दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही दोघे थांबले नव्हते.

नुकतंच रणवीर सिंहला एका मुलाखतीदरम्यान याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर तो म्हणाला, “दीपिका आणि मी त्याक्षणी एकमेकांमध्ये इतके गुंतलो होतो की आमच्या खोलीत बाहेरुन दगड आल्याचे आम्हाला समजले नाही. अनेकदा असे घडते. दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर तुम्हाला लगेचच त्यातून बाहेर पडणे शक्य होत नाही.”

“मला अजूनही रामलीलाच्या सेटवरील लिपलॉकचा एक खास प्रसंग अजूनही आठवतो. त्या सीनमध्ये खूप काही घडले होते. आम्ही दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेलो होतो. भन्साळींच्या चित्रपटात त्यावेळी घडलेला तो सीन अगदी खरा होता. त्यात काहीही खास इफेक्ट वापरण्यात आलेले नव्हते.” असे तो म्हणाला.

“आम्ही बेडवर किसिंग करत असताना बाहेरुन एक दगड खिडकीवर आदळणार असा तो संपूर्ण सीन होता. त्यानुसार आम्ही त्या बेडवर किसिंग सीन शूट करत होतो. त्यावेळी आम्ही दोघेही एकमेकांमध्ये गुंतलो होतो. त्यानंतर एक दगड काचेवर आदळला. पण त्याच्या आवाजाने आम्हाला शुद्धच नव्हती. आम्ही खरोखरच त्यात फार हरवून गेलो होतो.” असेही त्याने म्हटले.

रणवीर सिंह सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘जयेशभाई जोरदार’मुळे चर्चेत आहे. कॉमेडी ड्रामा असलेल्या या चित्रपटात रणवीर सिंह एका गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. जो आपल्या जन्माला येणार असलेल्या मुलीसाठी लढताना दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंहसोबत अभिनेत्री शालिनी पांडेय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रणवीर आणि शालिनी यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात बोमन ईरानी आणि रत्ना पाठक यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन दिव्यांग टक्कर यांनी केलं आहे. यशराज बॅनरची निर्मिती असलेला हा चित्रपट १३ मे ला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranveer singh could not stop kissing deepika padukone during ramleela shoot know what happens nrp

ताज्या बातम्या