बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग जेव्हाही कोणाला भेटतो तेव्हा तो समोरच्या व्यक्तिला मिठी मारतो किंवा किस तरी करतोच. नुकताच रणवीर, आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘ओके जानू’ या सिनेमाच्या स्क्रिनिंगला गेला होता. रणवीरने नेहमीप्रमाणे तेच केले जे तो करत असतो. त्याचा हा कीसचा फोटो दिग्दर्शक निर्माता करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअरही केला.

या फोटोमध्ये रणवीर आणि आदित्य रॉय कपूरने एकमेकांना किस करत असल्याची पोज दिली आहे तर श्रद्धा त्या दोघांना अडवताना दिसत आहे. या फोटोला बघून असेच म्हणता येईल की आदित्य आणि रणवीर हे ‘ओके जानू’ या सिनेमाच्या पोस्टरला पुन्हा एकदा नव्याने जगताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/BPJzgH1D1CO/

‘ओके जानू’ या सिनेमातून अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येत आहे. आर्किटेक्चर शिकण्यासाठी पॅरिसला जाणारी श्रद्धा आणि एका स्पर्धेसाठी अमेरिकेला जाणारा आदित्य हे लग्न न करता एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर या दोघांमध्ये फुलणारे प्रेम यात पाहावयास मिळते. विशेष म्हणजे, या सिनेमाचा ट्रेलर पाहताना या दोघांमधील ‘लव्ह केमिस्ट्री’ पाहता ‘आशिकी २’ सिनेमाची आठवण आल्यावाचून राहत नाही. त्यांच्या या रोमॅण्टिक सफरमध्ये अभिनेता नसिरुद्धीन शाह यांनीदेखील साथ दिली आहे. प्रेम आणि त्यानंतरचा दुरावा या सिनेमात पाहावयास मिळणार आहे.

एकंदरीत प्रेम, दुरावा, प्रेमभंग, प्रणय यांसारख्या गोष्टी पुन्हा एकदा ‘ओके जानू’ या सिनेमाद्वारे पाहावयास मिळणार आहेत. आजच्या तरुणाईची मानसिकता हाताळत एका सुरेख प्रेमकथेचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये वाजणारे संगीत हे नक्कीच लक्षवेधक आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक ए आर रेहमान याच्या आवाजातील गाणे ट्रेलरमध्ये ऐकावयास मिळते. ‘ओके जानू’ हा सिनेमा ‘ओके कन्मनी’ या सिनेमाचा अधिकृत रिमेक आहे. १३ जानेवारीला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.