बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या न्यूड फोटोशूटमुळे सतत चर्चेत आहे. रणवीरनं ‘पेपर’ या मासिकासाठी काही दिवसांपूर्वीच न्यूड फोटोशूट केलं. त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याची बरीच चर्चा झाली. रणवीर टीका करण्यात आली, एवढंच नाही तर मुंबईतील एका पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली. पण हे फोटोशूट नेमकं कुठे झालं? कसं झालं? आणि कोणी केलं? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तर हे फोटोशूट करणाऱ्या फोटोग्राफरनेच एका मुलाखतीत दिली आहेत.

वेगवेगळ्या कारणांनी गाजलेलं रणवीर सिंगचं हे फोटोशूट परदेशात नाही तर मुंबईतच झालं असून मुंबईतील फोटोग्राफर आशिष शाह यांनी हे फोटोशूट केलं आहे. नुकतंच ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या फोटोशूटबद्दल सविस्तर माहिती दिली. या फोटोशूटबद्दल बोलताना आशिष शाह म्हणाले की, “असं फोटोशूट करण्याचा निर्णय मी आणि रणवीरने मिळून घेतला होता. ‘पेपर’ मासिकाशी मागच्या काही महिन्यांपासून त्याचं याबाबत बोलणं सुरू होतं आणि अखेर हे फोटोशूट पूर्ण झालं. हे फोटोशूट नेहमीपेक्षा थोडं वेगळं होतं कारण रणवीरला एका विशिष्ट शारीरिक स्थितीमध्ये राहायचं होतं, शरीराची एक वेगळी आणि विशिष्ट ठेवण त्याला दाखवायची होती.”

आणखी वाचा- “महिलांनी शरीर दाखवलं तर…” रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर राम गोपाल वर्माची कमेंट चर्चेत

आशिष शाह पुढे म्हणाले, “या फोटोशूटसाठी जवळपास ३ तासांचा वेळ आम्हाला लागला आणि हे शूट आम्ही वांद्रे येथील ‘महबूब स्टुडिओ’मध्ये केलं आहे. या फोटोशूटसाठी रणवीरला स्वतःच्या शरीरावर वेगळी मेहनत घ्यावी लागली नाही कारण तो नेहमीच फिट असतो. मी याआधी पेपर मासिकासाठी काम केलं आहे. त्यावेळी या मासिकाने किम कार्दशियनचं शूट केलं होतं. मात्र रणवीरसोबत काम करण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. विशेष म्हणजे मी त्याला पहिल्यांदाच भेटलो होतो.”

आणखी वाचा- रणवीर सिंगला न्यूड फोटोशूट करणं पडलं महागात, मुंबईतील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणवीर सिंगबद्दल बोलताना आशिष शाह म्हणाले, “रणवीरला जेव्हा मी या फोटोशूटसाठी भेटलो तेव्हापासूनच तो या फोटोशूटबाबत अगदी सहज होता. तो अजिबात लाजला नाही किंवा त्याच्या मनात कशाची भीती नव्हती आणि तो अति उत्साही देखील नव्हता. त्याने खूप चांगलं सहकार्य केलं. मी कसं काम करतो याची त्याला माहिती होती. कारण एकमेकांवर विश्वास नसेल अशा सेलिब्रेटींसोबत मी काम करत नाही. पण रणवीरचं वागणं खूपच सहज होतं. त्यामुळे काम करणं सोप्पं गेलं. या फोटोंमधून बर्ट रेनॉल्डस यांना श्रद्धांजली द्यायची होती आणि विशेष म्हणजे यासाठी मला जसं शूट करायचं होतं तसं रणवीरने मला करू दिलं.”