रणवीर सिंगच्या बहुचर्चित ’83’ चित्रपटाचे नवे पोस्टर समोर, ‘या’ तारखेला ट्रेलर होणार प्रदर्शित

सध्या हे पोस्टर सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या अभिनय कौशल्यामुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या भूमिकांपेक्षा जास्त त्याच्या अतरंगी अवतारातील कपड्यांमुळे तो नेहमी चर्चेत असतो. रणवीर हा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. तो त्याच्या आगामी चित्रपटासंबंधीची सर्व माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतंच रणवीरने त्याच्या आगामी ’83’ चित्रपटाचे एक नवे पोस्टर शेअर केले आहे. सध्या हे पोस्टर सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

रणवीरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटो ’83’ असे मोठ्या अक्षरात लिहिलेले दिसत आहे. तर रणवीरच्या मागून संपूर्ण टीम धावताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर तिरंगी रंगात दिसत आहे. अवघ्या दोन तासांपूर्वी शेअर केलेल्या या पोस्टरला ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हे पोस्टर शेअर करताना रणवीरने कपिल देव यांचे एक वाक्य कॅप्शन म्हणून दिले आहे.

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांचा रॅपर अंदाज, बादशहासोबत करणार धमाल

“अनेकजण म्हणतात, एकदा तरी यशाची चव चाखा, ती जिभेला अजून हवीहवीशी वाटते,” असे कपिल देव यांचे वाक्य रणवीरने कॅप्शन म्हणून दिले आहे. हे पोस्टर शेअर करताना रणवीरने ट्रेलर कधी येणार याची माहिती चाहत्यांना दिली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ३० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे, असे रणवीरने म्हटले आहे.

हेही वाचा : 83 Teaser: इतिहास पुन्हा नव्याने जगण्याची संधी, पाहा अंगावर शहारे आणणारा टीझर

२५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. २४ डिसेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडा या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळली आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ranveer singh shared a new poster 83 movie new poster goes viral nrp

Next Story
‘देवमाणूस’ मालिकेतील कलाकाराने दिली प्रेमाची कबुली, व्हिडीओ व्हायरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी