बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘जयेशभाई जोरदार’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा चित्रपट येत्या १३ मे ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. या चित्रपटात रणवीर सिंह नेहमी पेक्षा खूपच वेगळ्या अवतारात दिसत आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणवीरनं डान्स इंडिया डान्सच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी मौनी रॉयसोबत फ्लर्ट करतानाचा रणवीरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डान्स इंडिया डान्सच्या मंचावरील काही फोटो आणि व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह हटके अंदाजात मौनी रॉयसोबत फ्लर्ट करताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये मौनी ब्लॅक कलरच्या लहंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तर रणवीर सिंह कलरफुल आउटफिट्समध्ये खूप कूल दिसत आहे.

आणखी वाचा- “हिंदी राष्ट्रभाषा नाही फक्त देशात…” अजय देवगण- किच्चा सुदीप वादावर सोनू निगमची प्रतिक्रिया

या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह मौनी रॉयला म्हणतो, “मौनी जी सध्या ग्लोबल वॉर्मिंग खूप वाढलं आहे. देशात उष्णता खूप वाढली आहे. याचं खरं कारण तुम्ही आहात. काही तरी दया करा. तसंही जर इथे उष्णता वाढली तर मी त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. असं म्हणून तो अग्निरोधक तिला दाखवतो.” मौनी रॉय आणि रणवीर सिंह यांचा हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

आणखी वाचा- देवदर्शनाला गेलेल्या तनुश्री दत्ताच्या कारचा अपघात, पायाला झाली गंभीर दुखापत

‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात रणवीर सिंहसोबत अभिनेत्री शालिनी पांडे मुख्य भूमिकेत आहे. तिने रणवीरच्या ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका साकारली आहे. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी वडील म्हणून रणवीर कसा तिचा रक्षक कसा होतो आणि आपल्याच वडिलांच्या विरोधात उभा राहतो. याची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटासोबत रणवीर सिंह ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘सर्कस’ या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh try to flirt with mouni roy on set of dance india dance video goes viral mrj
First published on: 03-05-2022 at 17:59 IST