scorecardresearch

Ranveer VS Wild : बायकोसाठी कायपण! दीपिकावरील प्रेमासाठी रणवीरनं उचलली मोठी जोखीम

रणवीर सिंग लवकरच बेयर ग्रील्सच्या ‘रणवीर वर्सेज वाइल्ड’मध्ये दिसणार आहे.

ranveer vs wild, ranveer singh, bear grylls, ranveer vs wild trailer, deepika padukone, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, रणवीर वर्सेज वाइल्ड, बेयर ग्रील्स, रणवीर वर्सेज वाइल्ड ट्रेलर
ट्रेलरमध्ये रणवीर सिंग बेयर ग्रील्ससोबत धम्माल मस्ती करताना दिसत आहेत.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या दमदार अभिनयासोबतच त्याच्या अतरंगी अंदाजासाठी देखील ओळखला जातो. इतरांपेक्षा नेहमीच काहीतरी वेगळं करणारा रणवीर सिंग त्याच्या याच अंदाजामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. लवकरच रणवीर बियर ग्रील्ससोबत ‘रणवीर वर्सेज वाइल्ड’ शोमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्यानं या शोचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता या शोचा ट्रेलर समोर आला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या ट्रेलरमध्ये रणवीर सातत्यानं दीपिकावरील प्रेम व्यक्त करत अॅडव्हेंचर करताना दिसत आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीला रणवीर म्हणतो, “हट्ट, स्वतःचा कम्फर्ट झोन सोडण्याचा हट्ट होता, पण हा हट्ट तुम्हाला कुठे नेऊन सोडेल सांगता येत नाही.” हा ट्रेलर पाहताना रणवीर या शोमध्ये जीवघेणे स्टंट करताना दिसणार असल्याचं लक्षात येतं. ट्रेलरमध्ये जंगलातील लांडगे, अस्वल यांसारख्या खतरनाक प्राण्यांसोबत रणवीरचे काही स्टंट पाहायला मिळत आहेत. एवढंच नाही तर तो डोंगर चढताना आणि अंधाऱ्या गुहेतून रस्ता काढतानाही दिसत आहे. या ट्रेलरमध्ये रणवीर बेयर ग्रील्ससोबत जंगली खाणं खाताना आणि सतत दीपिकावरील प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. ट्रेलरच्या शेवटी तो बेयर ग्रील्सला ‘जय बजरंगबली’ असं बोलायला शिकवताना दिसत आहे.

आणखी वाचा- सलमान खानबद्दल शाहरुखचं मोठं वक्तव्य, म्हणाला “मला त्याच्यासोबत कोणताही…”

ट्रेलरमध्ये रणवीर सिंग बेयर ग्रील्ससोबत धम्माल मस्ती करताना दिसत आहेत. सोबतच तो दीपिकाची वारंवार आठवण काढताना दिसत आहे. ‘फक्त दीपिकाच्या प्रेमामुळेच तो हे असे खतरनाक स्टंट करू शकला.’ असं म्हणतानाही दिसत आहे. रणवीरच्या या धमाकेदार ट्रेलरची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसत आहे.

‘रणवीर वर्सेज वाइल्ड’ लवकरच नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. रणवीरच्या चाहत्यांमध्ये या शोबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. ट्रेलरला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. येत्या ८ जुलैला हा शो नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. दरम्यान रणवीरच्या कामाबद्दल बोलायचं तर अलिकडेच प्रदर्शित झालेला त्याचा ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नव्हता. त्यामुळे आता या शोला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे. या शोच्या निमित्तानं रणवीर सिंग ओटीटी डेब्यू करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranveer vs wild ranveer singh adventure with bear grylls trailer release on netflix mrj

ताज्या बातम्या