‘पद्मावत’ सिनेमा गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. हा सिनेमा त्याच्या निर्मितीच्या घोषणेपासूनच वादात सापडला होता. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर रणवीर सिंगच्या भूमिकेचं सगळ्यांकडून कौतुक झालं पण त्याचबरोबर या सिनेमात मालिक काफूरच्या भूमिकेत असलेला जिम सर्भही भाव खाऊन गेला. ‘निरजा’, ‘राबता’ या सिनेमानंतर संजय लिला भन्साळींच्या पद्मावतमध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या गुलामाच्या भूमिकेत जिम होता. विशेष म्हणजे जिमचं नाव रणवीरनंचं सुचवलं होतं.
पद्मावतमध्ये अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याचा गुलाम मलिक काफूर यांच्यातील नात्यावरही हलका प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपटात सुलतानासाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार असणाऱ्या मलिक काफूर जिमनं उत्तम रंगवला. जिमनंच ही भूमिका साकारावी यासाठी रणवीर सिंग आग्रही होता. ‘निरजा’सिनेमातील जिमची भूमिका रणवीरला आवडली होती. त्यानं हा सिनेमा पाहिला होता आणि हाच मलिक काफूरची भूमिका उत्तम साकारू शकेल अशी आशा रणवीरला होती त्यामुळे या भूमिकेसाठी जिमचं नाव रणवीरनं सुचवलं होतं. रणवीरची ही निवड अगदी योग्य ठरली त्यामुळे दीपिका, शाहिदसोबत सहाय्यक अभिनेतेच्या भूमिकेत असलेला जिमही तितकाचा भाव खाऊन गेला.
जिमनं ‘निरजा’चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. निरजा चित्रपटात त्यानं विमानाचं अपहरण करणाऱ्या दहशतवाद्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.