करोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसे, दिग्गज आणि नामवंत व्यक्ती तसेच कलाकार मंडळी हे सर्वचजण घरामध्ये अडकून पडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’ या मालिकेतील अभिनेत्री रतन राजपूत बिहारमधील एका गावामध्ये अडकली आहे. ती तिकडचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.
रतन अशा गावामध्ये अडकली आहे जिथे तिला हव्या तशा सोयीसुविधांची कमतरता आहे. गावात टीव्ही नाही, अंघोळीसाठी बाथरूम नसल्याचेही तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते. आता रतनने इन्स्टाग्रामवर चुलीवर जेवण बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
रतनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती चुलीवर भात आणि भाजी बनवताना दिसत आहे. तसेच तिने हे पदार्थ कसे बनवले याची रिसेपी देखील ती व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.
View this post on InstagramThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.
लॉकडाउन सुरु होण्याआधी रतन तिच्या गावी फिरायला गेली होती. अचानक २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाउनची घोषणा केली आणि ती तिथेच अडकली. रतनने सोयीसुविधा नसलेल्या गावात राहातानाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला होता.