केंदातील मोदी सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आहे. आता या योजनेतूनच सैन्य भरती होणार आहे. या योजनेला काही लोकांनी पाठिंबा दिला आहे तर काहींनी विरोध केला आहे. यासगळ्यात अभिनेता आणि भारतीय जनता पक्षाचा नेता रवी किशनने या योजनेला पाठिंबा दिला आहे. एवढच काय तर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याची मुलगी इशिताला अग्निपथ योजनेतून सैन्यात भरती व्हायचे आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणारे तरुण सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

आणखी वाचा : तुम्ही मुस्लिमांना भारताचा भाग मानता का?, पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या फराह खानवर संतापले अशोक पंडित, म्हणाले…

रवी किशनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. रवीने त्याच्या मुलीचा एक फोटो शेअर केला आहे. याफोटोमध्ये एनसीसी कॅडेट प्रमाणपत्र आहे. हा फोटो शेअर करत, माझी मुलगी इशिता आज सकाळी म्हणाली, बाबा मला अग्निपथ आर्मी रिक्रूटमेंट स्कीममध्ये सामील व्हायचे आहे. हे ऐकून मी तिला लगेच परवानगी दिली.

आणखी वाचा : सोनम कपूरच्या बेबी शॉवरमधील गायक लियो कल्याणचा ‘तो’ फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले…

आणखी वाचा : “आयुष्यात लाईफ पार्टनर नाही आणि आता या टप्प्यावर…”, करण जोहरने व्यक्त केली खंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी सरकारने अलीकडेच अग्निपथ योजने अंतर्गत ४ वर्षांसाठी सैनिकांची नियुक्ती केली जाईल, अशी घोषणा केली. त्यानंतर ७५ टक्के सैनिकांना घरी पाठवले जाईल, तर उर्वरित सैनिकांना कायमस्वरूपी पदांवर नियुक्त केले जाईल. या योजनेच्या समर्थनार्थ आणि विरोधात सोशल मीडियावर नेटकरी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.