गुजरात म्हणजे महात्मा गांधी यांची भूमी. तेथील दहा गुन्हा अन्वेषण पत्रकारांना जे डे खून खटल्यातील खरे गुन्हेगार कोण आणि त्यांचा त्यामागील नेमका हेतू काय होता हे जगापुढे आणायचे आहे. गुजरात मध्ये इतर सुद्धा काही सामाजिक समस्या आहेत. त्या समस्या या पोलिसांकडून किंवा कोणत्याही न्यायव्यवस्थेकडून सोडवल्या गेलेल्या नाहीत. त्या समस्या सोडवल्या जाण्यासाठी हे पत्रकार प्रयत्न करत आहेत ,त्या संदर्भात ते स्वतः कार्यरत आहेत. याच पत्रकारांना नंदिता सिंघा (मिशेल ) यांच्या रेड या चित्रपटाचा टीझर समर्पित करण्यात आलेला आहे. लवकरचं या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
गुन्हेगारी पत्रकारिता या विषयावर नंदिता सिंघा ( मिशेल ) यांनी आतापर्यंतचे पाच चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. या विषयावर सर्व पाच चित्रपट करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला दिग्दर्शिका आहेत. त्या म्हणतात ,”फर्स्ट लूक पोस्टरच्या माध्यमातून गुन्हेगारी पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या पत्रकारांच्या नेमक्या भावना काय असतात हे मला समाजापुढे आणायचे आहे. गुन्ह्यावर आधारित गोष्टीला जर खरा न्याय द्यायचा असेल तर एखाद्या पत्रकाराला सुद्धा प्रथम गुन्हेगाराच्या आणि नंतर क्राईम रिपोर्टर च्या भूमिकेतून विचार करावा लागतो. कारण अशा गोष्टी म्हणजे मनोभूमिका, भावना, गुन्हा करण्यामागचा हेतू, कबुली जबाब आणि अनेक गोष्टींचे मिश्रण असते. यात जे कथानक असते त्या कथानकाने क्राईम डिरेक्टर अर्थात दिग्दर्शक या भूमिकेतून नेमकी पकड घ्यायला हवी. तेच खरे आव्हानात्मक असते. गुन्हेगारी विश्व चित्रित करताना पटकथा आणि संवाद खूप महत्वाची भूमिका बजावतात. मी कथा आणि पटकथा यावर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहतील आणि त्यांचे मनोरंजन देखील होईल
“रेड” ह्या हॉलीवूड सिनेमाचे डबिंग हे मराठी, हिंदी तसेच इतर काही प्रादेशिक भाषांमध्ये ही करण्यात येणार आहे. लवकरच जे. डे. ह्याच्या जीवनावरील सिनेमा नंदिता सिंघा (मिशेल) तयार करणार असून हा सिनेमा खास करून मराठीत तयार होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Oct 2015 रोजी प्रकाशित
.. या हॉलीवूड चित्रपटाचे होणार मराठीत डबिंग
'रेड' ह्या हॉलीवूड सिनेमाचे मराठी, हिंदी तसेच इतर काही प्रादेशिक भाषांमध्ये डबिंग करण्यात येणार आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 09-10-2015 at 11:50 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Red hollywood movie will be dube in marathi