बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांना आजवर हॉलिवूडच्या पडद्यावर आपल्या दर्जेदार अभिनयाचे प्रदर्शन करताना आपण पाहिले आहे. आनंदाची बाब म्हणजे यापुढे आता आपल्याला मराठी कलाकारही हॉलिवूडपटांमध्ये झळकताना दिसतील. विशेष म्हणजे एक दोन नाही तर एकाच वेळी अनेक दिग्गज मराठी कलाकार या हॉलिवूडपटात काम करताना दिसणार आहेत.

लेखक आणि दिग्दर्शक डॉ. रवि गोडसे यांचा ‘रिमेंबर अमेझिया’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भारतीय संस्कृतीवर आधारित असलेल्या या चित्रपटात मराठी अभिनेत्री श्रृती मराठेसह अनेक दिग्गज कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात महेश मांजरेकर, विजय पाटकर, जयवंत पाटेकर, आनंद काळे आणि मेधा मांजरेकर ही कलाकार मंडळी आपल्याला दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

Another one ! #sareelove

A post shared by Shruti Marathe (@shrumarathe) on

हा एक मल्टिस्टारर चित्रपट आहे. यात मराठी कलाकारांबरोबरच हिंदी आणि हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील कलाकारही दिसतील. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. हॉलिवूडपटात मराठी कलाकारांचा भरणा असलेला ‘रिमेंबर अमेझिया’ येत्या नोव्हेंबरमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.