गुजरातमधील जामनगर इथं सध्या अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाची जय्यत तयारी चालू आहे. १ मार्च ते ३ मार्चदरम्यान विविध कार्यक्रम जामनगरमध्ये पार पडतील. त्यासाठी भारतातीलच नाही तर जगभरातील अनेक सेलिब्रिटींना निमंत्रित करण्यात आलं आहे. या यादीत जगप्रसिद्ध गायिका रिहानाचं नावदेखील आहे. रिहाना व तिची टीम या कार्यक्रमासाठी जामनगरमध्ये पोहोचली आहे.

राधिका मर्चेंट आणि अनंत अंबानी यांच्यासोबत तीन दिवसांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमामध्ये रिहानासह, अरिजित सिंह, दिलजीत दोसांझ, बी प्राक, प्रीतम, हरिहरन आणि अजय-अतुल यांचे परफॉर्मन्स देखील असतील. रिहाना २०१६ पासून म्युझिक टूरवर गेलेली नाही, त्यामुळे तिच्या भारतातील कार्यक्रमाची चांगलीच चर्चा होत आहे. रिहानाच्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ती एका सादरीकरणासाठी किती मानधन घेते याबद्दल जाणून घेऊयात.

“राधिका माझ्या स्वप्नातील राणी,” अनंत अंबानींचे होणाऱ्या पत्नीबाबत विधान; वाढलेल्या वजनाबद्दलही केलं भाष्य

रिहानाचं खासगी कार्यक्रमातील सादरीकरणासाठी मानधन किती?

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात सादरीकरणासाठी रिहानाने किती मानधन घेतलंय, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण जीक्यू इंडियाने दिलेल्या इंडस्ट्री रिपोर्ट्सनुसार, रिहाना एका खासगी कार्यक्रमासाठी १.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास १२ कोटी रुपये ते आठ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ६६ कोटी रुपयांपर्यंत फी आकारते.

Photo : अनंत अंबानीपेक्षा मोठी आहे राधिका मर्चंट, दोघांच्या वयात आहे तब्बल ‘एवढे’ अंतर

इव्हेंटसाठी तुम्ही रिहानाला कसे बूक करू शकता?

रिहानाला एखाद्या खासगी कार्यक्रमासाठी बूक करण्यासाठी तुम्हाला तिच्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीशी संपर्क साधावा लागतो. ती संबंधित तारखांना उपलब्ध आहे की नाही हे तिची टीम सांगते, त्यानुसार तुम्ही तिला इव्हेंटसाठी बूक करू शकता.

रिहानाच्या मानधनावर परिणाम करणारे घटक कोणते?

खासगी कार्यक्रमासाठी रिहाना जी फी घेते ती अनेक गोष्टींवर अवलंबून असते. यामध्ये परफॉर्मन्सची लांबी (परफॉर्मन्स जितका जास्त असेल, तितकी फी जास्त), प्रवास आणि राहण्याचा खर्च, साउंड सिस्टम, लाइटिंग आणि स्टेज सेटअप यासारख्या घटकांच्या आधारे तिच्या कार्यक्रमाची फी ठरते. इतकंच नाही तर एखाद्या ठराविक कालावधीतील कार्यक्रमांदरम्यान वेळ असूनही तिने दुसरीकडे परफॉर्म करू नये, अशी आयोजकांची अट असेल तर त्या परिस्थितीत ही फी आणखी वाढू शकते.