काही गाणी काळाच्या कसोटीवर टिकतात. कितीही जुनी झाली तरीही ती सतत ऐकावी वाटतात. आजच्या भाषेत म्हणायला गेलात तर अशी गाणी सदाबहार ट्रेंडिंग राहतात. जुन्या गाण्यांची हीच मजा होती. आजच्या काळातही ती तितक्याच रसिकतेने ऐकली जातात. पण या गाण्याचं रिक्रिएशन कोणी केलं तर? अगदी हुबेहुब त्यावेळची परिस्थिती निर्माण करणे तसं कठीण काम. पण, इच्छाशक्ती असेल तर काहीही साध्य होतं. तसंच काहीसं घडलं आहे ‘रिमझिम गिरे सावन’ या गाण्याचे रिक्रिएशन करणाऱ्या निर्मात्यांच्या बाबतीत. खरंतर हे निर्माते म्हणावे तसे या क्षेत्रातील मुरलेले किंवा मातब्बर निर्माते नाहीत. फक्त आपल्या मित्राची बकेट लिस्ट पूर्ण करण्याकरता केलेला हा प्रयोग होता. पण तो प्रयोग इतका यशस्वी झाला की आज प्रत्येकाच्या सोशल मीडिया स्टेटसवर या हे रिप्लिका गाणं वाजत होतं.

शैलेंद्र इनामदार आणि त्यांची पत्नी वंदना इनामदार या रिल आणि रिअललाईफ कपलने रिमझिम गिरे सावन या सदाबहार गाण्याचं रिक्रिएशन केलं आहे. मुंबईतील त्याच जागांवर त्याच स्टाईलमध्ये या गाण्याचं चित्रिकरण करण्यात आलंय. अनुप आणि अंकिता रींगणगावकर या जोडप्याने हे गाणं चित्रित केलं, तर त्यांचा मुलगा अपूर्व याने हे चित्रिकरण एडिट केलंय.

Neet action against Subodh Kumar Singh after NET paper leak
‘एनटीए’प्रमुखांची उचलबांगडी; नीट, नेट पेपरफुटीनंतर सुबोध कुमार सिंह यांच्यावर कारवाई
MP Chirag Paswan Leaked Video
कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांच्या लीक क्लिपमुळे खळबळ, मोदींवरही होतेय टीका! Video मध्ये काय व कधी घडलं?
Kangana Ranuat
कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कॉन्स्टेबलच्या भावाची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी बहीण…”
Mumbai, Extortion, woman,
मुंबई : चित्रीकरणाच्या माध्यमातून महिलेकडून खंडणी उकळली, आरोपीला पोलिसांकडून अटक
Loksatta viva Cannes International Film Festival for Indians important
कानच्या निमित्ताने..
Janhvi Kapoor, fan,
जान्हवी कपूरच्या चाहत्याने ‘मिस्टर ॲण्ड मिसेस माही’ चे १८ खेळ केले बूक
fraud of 1.5 crore with director by lure of double profit
मुंबई : दुप्पट फायद्याच्या नावाखाली दिग्दर्शकाची दीड कोटींची फसवणूक
Chhaya Kadam Nagraj manjule friendship
“नागराजसारखा माणूस मित्र म्हणून आयुष्यात असावा, कारण…”; अभिनेत्री छाया कदम यांचे वक्तव्य

सध्या सोशल मीडियावर रिमझिम गिरे सावन या गाण्याचं केलेलं रिक्रिएशन तुफान व्हायरल होतंय. एवढंच कशाला प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही या रिक्रिएशनचं कौतुक केलंय. रिमझिमच्या मूळ गाण्यात ज्या पद्धतीने नृत्य दिग्दर्शन करण्यात आलंय, अगदी जसंच्या तसं रिक्रिएशनमध्ये नृत्य दिग्दर्शन दिसतंय. एवढंच नव्हे तर त्या काळात हे गाणं मुंबईच्या ज्या ज्या लोकेशन्सवर शूट झालं ती सर्व लोकेशन्स जशीच्या तशी दाखवण्याचाही प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळे या गाण्याची मॉर्डन फ्रेम पाहताना जुन्या गाण्याची फ्रेम आठवल्याशिवाय राहत नाही.

या गाण्याचं रिक्रिएशन तुफान व्हायरल झाल्यानंतर आम्ही थेट या गाण्याचे नृत्य दिग्दर्शक आणि व्हिडिओग्राफर अनुप रींगणगावकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या प्रक्रियेविषयी अगदी भरभरून सांगितलं. “प्रत्येकाच्या आयुष्यात एक बकेट लिस्ट असते. या बकेट लिस्टमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. कधी पूर्ण होणाऱ्या, कधी न होणाऱ्या. अशाच आमच्या एका मित्राच्या बकेट लिस्टमध्ये या गाण्यावर काहीतरी करण्याची इच्छा होती. त्याने ती इच्छा बोलून दाखवली. मग या गाण्याचं रिक्रिएशन करण्याची कल्पना सुचली. शैलेश इनामदार आणि मी इयत्ता पाचवीपासून मित्र आहोत. त्यामुळे त्याची ही बकेट लिस्ट पूर्ण व्हावी अशी माझी मनापासून इच्छा होती. अगदी सहज सुचली कल्पना आणि अगदी कमी वेळात ती पूर्ण झाली”, असं अनुप रींगणगावकर सांगत होते.

४० वर्षांनी योग आला जुळून

“हे मूळ गाणं चित्रित करतानाही पहिल्या दिवशी पाऊस पडला नव्हता, असा संदर्भ आम्हाला या मूळ गाण्याच्या मेकिंगच्या व्हिडिओमधून मिळाला. आणि योगायोग म्हणजे आम्हीही या गाण्याच्या रिक्रिएशन चित्रिकरणासाठी जो दिवस निवडला त्या दिवशीही अजिबात पाऊस पडला नाही. हवामान खात्याचा अंदाज घेऊनच चित्रिकरणाचा दिवस ठरवण्यात आला होता. तरीही पावसाने दडी मारली आणि आम्ही त्यादिवशी फक्त एकच सीन शूट करू शकलो”, अशी माहिती अनुप यांनी दिली.

एखादी सुंदर कलाकृती घडत असते तेव्हा संपूर्ण जग नकळतपणे साथ देतं, असा अनुभवही अनुप यांना या गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान आला. “पहिल्या दिवशी पावसाने हिरमोड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाच्या दरम्यान रिमझिम पावसाला सुरुवात झाली. थोड्या वेळाने पावसाने चांगला जोर धरला. आम्ही यावेळी नरिमन पॉइंट गाठलं. पावसाच्या काळात तेही पहिल्या पावसाच्या दिवशी नरीमन पॉइंटवर गर्दी नसणे ही अशक्यप्राय गोष्ट. त्यात या गर्दीत शूट करायचं म्हणजे त्याहून जिकरीचं काम. पण आमच्या सुदैवाने नरिमन पॉइंटवर अजिबात गर्दी नव्हती. अगदी शुकशुकाट. त्यामुळे आम्हाला चित्रिकरणाला अगदी सोपं गेलं. हवे तसे सीन्स घेता आले. गाण्यामध्ये ज्यापद्धतीने गाड्यांचा, माणसांचा वावर आहे, मला अगदी तसंच सगळं माझ्या चित्रिकरणात हवं होतं. थोड्या मेहनतीने जसेच्या तसे सीन्स आम्ही घेऊ शकलो”, असंही अनुप अगदी उत्साहाने सांगत होते.

पावला-पावलावर मुंबई बदलत जातेय, असं मुंबईकर सहज म्हणतात. त्यामुळे ४० वर्षांत तर मुंबईत कितीतरी बदल झाला असेल. पण याविषयी अनुप यांचा वेगळाच अनुभव आहे. ते म्हणतात, “मुंबई अजिबात बदलली नाही. मुळ गाण्यातील सीन्स आम्हाला त्या त्या लोकेशन्सवर सहज घेता आले. काही अपवाद वगळता आम्हाला जसेच्या तसे सीन्स मिळाले. अगदी राजाभाई टॉवर दिसत असलेल्या एका सीनमध्ये समोर एक डबकं (मूळ गाण्यात) आहे. अमिताभ आणि मौसमी चॅटर्जी त्या डबक्यातून रोमॅन्टिक अंदाजात चालत जातात. आम्हालाही तोच सीन घ्यायचा होता. योगायोगाने मूळ गाण्यात ज्याप्रमाणे डबकं होतं तसंच, डबकं आम्हाला तिथे दिसलं. त्यामुळे ते डबकं बुजायच्या आत आम्ही तिथे आमचा सीन शूट करून घेतला. त्यामुळे मूळ गाण्याप्रमाणेच रिक्रिएशनमध्येही पावसाचा मस्त फिल प्रेक्षकांना घेता येतोय”, असंही अनुप म्हणाले.

गाण्याचं शुटींग आयफोनमधून

या गाण्याचं रिक्रिएशन एकदम परफेक्ट झालंय, त्यामुळे एखाद्या मातब्बर दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली आणि व्हिडीओ ग्राफरच्या मोठाल्या लेन्समधून हे गाणं चित्रित झालं असेल असं तुम्हाला वाटेल. पण हे गाणं चित्रित केलंय या क्षेत्राशी सुतरामही संबंध नसलेल्या दिग्दर्शकाने. अनुप रींगणगावकर हे मुळचे नागपूरचे असून सध्या पुण्यात असतात. तर ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. तर, या गाण्यात अमिताभ बच्चनची भूमिका निभावणारे शैलेंद्र इनामदार हे हायड्रॉलिक्स क्षेत्रातील आहेत. त्यामुळे हे गाणं त्यांनी फक्त एक हौस म्हणून चित्रित केलंय असं अनुप म्हणाले. आश्चर्य म्हणजे हे गाणं शूट केलंय आयफोन १३ प्रो मोबाईलमधून. म्हणजे लेन्सचा कॅमेरा न वापरता मोबाईलवर हे गाणं शूट करण्यात आलंय.

मुंबईविषयी कौतुक करताना अनुप म्हणाले, “पालिकेला श्रेय दिलं पाहिजे. एकही खड्डा मला सापडला नाही. मूळ गाण्याप्रमाणे मला साचलेलं पाणी हवं होतं, पण मला एकही खड्डा मिळाला नाही. मुंबई बदलत नाही, माणसं बदलतात. आपण ज्या दृष्टीने पाहतो तशीच मुंबई दिसते. मुंबई मेरी जान म्हणतात ते पदोपदी खरं आहे. ज्याला जशी हवीय तशी मुंबई दिसते. हा व्हिडीओ आम्ही आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपसाठी केला होता. पण तो आता तुफान व्हायरल झालाय.

चौघांच्या मेहनतीने हे गाण्ं शूट झालं, ते आज प्रत्येकाच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर दिसत होतं. अशा पद्धतीची अनेक रिक्रिएशन करण्याचा त्यांचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं.