पाकिस्तानच्या विजयावर ऋषी कपूरचे ट्विट, भडकले चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने बुधवारी इंग्लंडवर ८ गडी राखून मात केली. इंग्लंडवरच्या विजयामुळे पाकिस्तान पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. पाकिस्तानच्या विजयानंतर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करायला सुरूवात केली.

स्वतःवरचेच व्हायरल जोक्स जेव्हा रिंकू वाचते…

दरम्यान, ऋषी कपूर यांनीही पाकिस्तानचे अभिनंदन करणारे एक ट्विट केले. पण या ट्विटमध्ये त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना अप्रत्यक्ष टोमणाही लगावला, ज्यामुळे त्यांना पाकिस्तानी चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. पाकिस्तानच्या विजयानंतर ऋषी यांनी लिहिले की, पाकिस्तान तुम्ही अंतिम फेरीत पोहोचलात यासाठी तुमचे अभिनंदन. नंतर त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या जर्सीच्या रंगांचा उल्लेख करत म्हटले की, आता भारताकडून हरायला तयार व्हा. ऋषी यांच्या या ट्विटमुळे पाकिस्तान क्रिकेट टीमचे चाहते त्यांच्यावर भडकले आणि त्यांना ट्रोल करू लागले. एका चाहत्याने उत्तर देत ऋषी यांच्या एका सिनेमाचा स्क्रिन शॉट पाठवला, ज्यात त्यांनी हिरव्या रंगाचे कपडे घातले होते. तर दुसऱ्या युझरने, तुमचं डोकं ठिकाणावर नाही असं म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.