अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी ‘माऊली’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘लय भारी’ या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जेनिलिया एकत्र येत ‘माऊली’ प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने याचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात रितेश एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि दमदार संवादांचा समावेश करण्यात आला असून ‘आपल्या सारखा TERROR नाय’ हा रितेशचा संवाद चांगलाच गाजत आहे. त्यामुळे आता चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
इन्स्पेक्टर माऊली सर्जेराव देशमुख म्हणत्यात मला…
आपल्या सारखा TERROR नाय…..https://t.co/Sbp9CdBkHa@geneliad @saiyamikher @jitendrajoshi27 @AdityaSarpotdar @kshitij_p @amalendu_dop @siddharth23oct @AjayAtulOnline @guruthakur @mfc @h_talkies @JioCinema @MeMauli— Riteish Deshmukh (@Riteishd) November 29, 2018
१४ डिसेंबरला रितेशचा हा चित्रपट प्रदर्शित होणात असून, आदित्य सरपोतदारने त्याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘मुंबई फिल्म कंपनी’ आणि ‘हिंदुस्तान टॉकीज’च्या निर्मितीअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अजय- अतुल या जोडीने घेतली आहे. त्यामुळे ‘माऊली’च्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या संगीताने आसमंत दुमदुमणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही.