scorecardresearch

‘…तुम्ही म्हातारे झाले आहात’ असे म्हणताच जिनिलियाने केले असे काही, रितेश देशमुखचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

‘…तुम्ही म्हातारे झाले आहात’ असे म्हणताच जिनिलियाने केले असे काही, रितेश देशमुखचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
रितेश देशमुख जिनिलिया देशमुख

बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातील प्रेम दिसून येते. रितेश आणि जिनिलिया हे दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. रितेश हा नेहमी त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतंच रितेश देशमुखने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नुकतंच रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक मजेशीर रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जिनिलियाही दिसत आहे. रितेशने शेअर केलेल्या या व्हिडीओत ते दोघेही धमाल करताना दिसत आहे. यावेळी रितेश म्हणतो, “जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या पत्नीच्या प्रेमात पडतात, तेव्हा समजून जा की तुम्ही म्हातारे झाले आहात.” यावर जिनिलियाही फारच हटके प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे.

रितेश देशमुखने ‘तो’ व्हिडीओ शेअर केल्यावर संतापली जिनिलिया, म्हणाली “तू आता…”

रितेशचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. यावर एक नेटकरी म्हणाला, वहिनींना तुमच्यावर उलट प्रेम होत आहे. त्यासोबतच या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी हसतानाचे इमोजीही शेअर केले आहेत.

रितेश देशमुखकडून तुला मिळालेलं सर्वोत्तम गिफ्ट कोणतं? जिनिलिया म्हणाली…

दरम्यान ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्याच निमित्ताने ते पहिल्यांदाच हैदराबाद विमानतळावर भेटले. मात्र यावेळी जिनिलियाचे वागणे रितेशला फार काही पटले नाही. त्याने स्वत:हून तिच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला मात्र जेनेलियाने त्याच्याकडे थोडेसे दुर्लक्ष केले. परंतु पुढे जसजसे एकमेकांना त्यांचे स्वभाव कळत गेले तसे त्यांच्यातले प्रेम खुलले. २०१२ मध्ये ते लग्न बंधनाता अडकले. त्या दोघांना रियान आणि राहिल अशी दोन मुले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या