अभिनेता रितेश देशमुख याने लातूरच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी २५ लाख रूपयांचा निधी दिला आहे. रितेशच्या या मदतीमुळे लातूरकरांना दिलासा मिळाला आहे.
सिनेजगतातील अनेक मंडळी सध्या दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी धावून येत आहेत. मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर यांनी ‘नाम’ फाउंडेशनद्वारे काम करत आहेत. अभिनेता अक्षय कुमार यानेही दुष्काळग्रस्तांसाठी आतापर्यंत ५० लाख रूपये दिले आहेत. राज्यातील दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी अभिनेता आमिर खान आणि लेखक- दिग्दर्शक सत्यजीत भटकळ यांनी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने ‘पाणी फाऊंडेशन’मार्फत राज्यभरात गावागावात जाऊन जलसंधारणाची काम करण्यात येत आहेत. ‘पाणी फाऊंडेशन’ने ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.  महत्त्वाचं म्हणजे ‘पाणी फाऊंडेशन’च्या या उपक्रमाशी सचिन तेंडुलकर, रतन टाटा यासारख्यांचाही सहभाग आहे. आता या मदत कार्यात रितेश देशमुख यानेही आपले नाव कोरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ritiesh deshmukh donates 25 lacs for jalyukta latur
First published on: 23-04-2016 at 15:27 IST