सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात कारवाई झाल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती बॉलिवूडपासून दूर गेली आहे. सोशल मीडियावर देखील रिया फारशी सक्रिय नसते. मात्र नुकतीच रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत मदतीचा हात पुढे केला आहे. सध्याकरोनाच्या काळात अनेक सेलिब्रिटी गरजुंच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. कुणी रुग्णांना बेड मिळावा यासाठी प्रयत्न करतंय तर कुणी ऑक्सिनजन पुरवठ्यासाठी. यातच आता रियादेखील मदतीसाठी पुढे आली आहे.

रियाने तिच्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हंटलं आहे, ” कठीण काळात एकत्र येण्याची गरज आहे. तुम्हाला शक्य त्यांना मदत करा, छोटी मदत किंवा मोठी मदत..मदत ही मदत असते. मी जर कुणाची मदत करू शकत असेल तर मला डायरेक्ट मेजेस करा. मी शक्य ते करेन, काळजी घ्या, थोडी दया दाखवा.” असं म्हणत तिने मदतीचा हात पुढे केला आहे.

Wasim Akram Reacts On Hardik- Rohit Controversy
हार्दिक पंड्याच्या मुलाचा उल्लेख करत वसीम अक्रमने हार्दिक- रोहितबाबत वादावर मांडलं मत; म्हणाला, “२० वर्षांपूर्वी..”
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर रियाने अगदी मोजक्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. या प्रकरणानंतर रियाच्या मनावर मोठा आघात झाल्याचं तिने म्हंटलं होतं.

रिया चक्रवर्तीने ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘सोनली केबल’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण ‘जलेबी’ या चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली. आता ती लवकरच बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘चेहरे’ या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे.