RJ Mahvash Cheating Video: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आरजे माहवश सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. युजवेंद्र चहलच्या घटस्फोटानंतर ती त्याच्याबरोबर बरेचदा दिसते. त्यामुळे हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, असं म्हटलं जातंय. मात्र, ते दोघेही एकमेकांना फक्त मित्र म्हणत आहेत.
आरजे माहवश तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चहलसाठी पोस्ट करत असते. तसेच इतरही बरेच व्हिडीओ शेअर करत असते. तिने नुकताच फसवणुकीबद्दल एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर एका युजरने पती चोरण्याचा उल्लेख करत कमेंट केली होती. त्याला माहवशने सणसणीत उत्तर दिलं आहे.
आरजे माहवशच्या व्हिडीओत काय?
माहवशने गाडीत बसून एक व्हिडीओ बनवला. ज्यामध्ये ती फसवणूकीबद्दल बोलते. कोणत्या गोष्टी करणं फसवणूक असते, त्याबद्दल ती सांगते. एखाद्याला सिक्रेट मेसेज पाठवणं, एखाद्याचे मेसेज डिलीट करणं म्हणजे फसवणूक, तुमच्या एक्सबरोबर लपून बोलणे म्हणजे फसवणूक, जिममधील शर्टलेस तरुणांना फायर इमोजी पाठवणे म्हणजे फसवणूक, सेमी-न्यूड कंटेंट बनवणाऱ्या मुलींना फॉलो करणे म्हणजे फसवणूक, तुमचे स्नॅपचॅट आयडी लपवणे म्हणजे फसवणूक, जर एखादा हॉट मुलगा किंवा मुलगी जवळून जात असेल, तर त्यांच्याकडे पाहत राहणं आणि नजरेने त्यांना घरी सोडणे म्हणजे फसवणूक, असं माहवश म्हणाली.
कॅप्शनमध्ये आरजे माहवशने लिहिलं, “अशा लोकांना सोडून द्या. असे लोक स्वतःच नैराश्यात मरतील. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जर कोणाची फसवणूक होत असेल तर त्या व्यक्तीसाठी दुःख होतं की खरं प्रेम रोज मिळत नाही, हे तिने समजूनच घेतलं नाही. प्रेम ही खूप खास गोष्ट आहे. पण तुमची त्या व्यक्तीकडून पुन्हा फसवणूक होईल, त्यानंतरही वारंवार होईल. जेव्हा देव तुम्हाला त्याबद्दल सावध करतो तेव्हा ते संकेत समजून घ्या.”
तिने पुढे लिहिलं, “माफी काय असते? कधीच माफ करायचं नाही, नाहीतर पुन्हा ते तुमच्याशी असंच वागतील. मी माझ्या शेवटच्या नात्यात तीन वेळा माफ करून पाहिलं. कुणालाही तुमचा वारंवार अपमान करू देऊ नका. तुम्हाला त्यांच्यापेक्षा चांगले बरेच लोक भेटतील. योग्य व्यक्तीबरोबर आयुष्य खूप लहान आहे, पण चुकीच्या व्यक्तीबरोबर खूप मोठं आहे.”
आरजे माहवशने ट्रोलरला दिलं उत्तर
आरजे माहवशच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहे. एका युजरने “कुणाचा तरी पती चोरणं?? चीटिंग” अशी कमेंट केली होती. त्याला माहवशने उत्तर दिलं.

“मी चोरला नाही, त्यामुळे मला माहीत नाही, पण हो. कोणाचाही पती चोरणं ही चीटिंग आहे,” असं उत्तर माहवशने युजरला दिलं.