रॉजर फेडररला टेनिस सम्राट म्हणून गौरवले जाते. तब्बल आठ वेळा विम्बल्डन चषकावर आपले नाव कोरणारा रॉजर टेनिस विश्वात नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळी टेनिस नव्हे तर चक्क बॉलिवूडमुळे तो चर्चेत आहे.

राजरने बॉलिवूड चित्रपटांबाबत एक ट्विट केले आहे. “एखादा चित्रपट सुचवू शकता का?” अशा शब्दात केलेल्या या ट्विटला सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी या ट्विटला रिट्विट करत त्याने कोणता चित्रपट पाहावा यासाठी त्याला मार्गदर्शन केले आहे.

रॉजर चोविस तास फक्त टेनिसचाच विचार करतो. त्याला चित्रपट किंवा नाटक पाहणे फारसे आवडत नाही. असे त्याने आजवर दिलेल्या अनेक मुलाखतीमधून सांगितले आहे. या पार्श्वभूमिवर रॉजरने बॉलिवूड चित्रपट पाहण्यासाठी मागितलेला सल्ला अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे.