..म्हणून रणवीरला मिळालं ८ लाख रुपयांचं घड्याळ

वाढदिवसापूर्वीच रणवीरला ही खास भेटवस्तू मिळाली आहे.

ranveer
रणवीरला मिळालं ८ लाख रुपयांचं घड्याळ
येत्या ६ जुलै रोजी बॉलिवूडचा बाजीराव अर्थात रणवीर सिंग आपला ३३वा वाढदिवस साजरा करणार आहे. मात्र वाढदिवसापूर्वीच त्याला एक खास भेटवस्तू मिळाली आहे. ही भेटवस्तू अत्यंत महाग असून दिग्दर्शक रोहित शेट्टीने त्याला दिली आहे.

रोहितने रणवीरला तब्बल ८ लाख रुपयांचं घड्याळ भेट म्हणून दिलं आहे. मलर्स वॅगंड कलेक्शनच्या या घड्याळाचा फोटो रणवीरने ट्विटरवर शेअर केला आहे. ‘बॉसकडून मिळालेलं वाढदिवसाचं पहिलं गिफ्ट. मला आतापर्यंत मिळालेली ही सर्वांत आकर्षक भेटवस्तू आहे,’ असं कॅप्शन त्याने फोटोसह लिहिलं आहे.

Video : पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री; या बायोपिकमधून उलगडणार सनीचा प्रवास

रोहित शेट्टी दिग्दर्शित आगामी ‘सिम्बा’ या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिका साकारत आहे. यामध्ये रणवीरसोबत सैफ अली खानची मुलगी सारा अली खान स्क्रीन शेअर करणार आहे. रणवीत या चित्रपटात संग्राम भालेराव ऊर्फ सिम्बा ही भूमिका साकारत असून त्याचा लूक ‘सिंघम’मधल्या अजय देवगणसारखाच आहे. ‘टेम्पर’ या तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असून प्रेक्षकांमध्ये याची फार उत्सुकता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rohit shetty gifts costly watch to ranveer singh before his birthday