बॉलिवूड चित्रपटांमध्ये जबरदस्त अॅक्शन सीन्ससाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी ओळखला जातो. रोहित शेट्टी आणि अॅक्शन सीन्स याचं एक वेगळच समीकरणच आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये अॅक्शन सीन्स हे असतातच. आता सोशल मीडियावर रोहित शेट्टीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रोहितने चक्क कार उचलली आहे.

रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हाताने कार उचलतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही कार उचलण्यासाठी त्याने हातात एक रुमाल घेतला असल्याचे दिसत आहे. सध्या रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत रोहित शेट्टीने ‘कोणतेही प्रोटीन शेक नाही, सप्लीमेंट नाही… केवळ देसी घी आणि घरचे जेवण…’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. रोहितचा हा व्हिडीओ जवळपास ४ लाखा पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लवकरच रोहित डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. तो आठ भागांची एक अॅक्शन थ्रिलर वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज एका सत्य घटनेवर आधारीत असणार आहे. पण या सीरिजचे नाव काय असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या रोहित त्याचा आगामी चित्रपट ‘सर्कस’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. लॉकडाउनमध्ये मिळालेल्या वेळात रोहित शेट्टीने या सीरिजची स्क्रिप्ट तयार केली असल्याचे म्हटले जात आहे.